Tuesday, October 3, 2023
घर मानिनी Kitchen Soyabean Chilli : अशी बनवा चटपटीत सोयाबीन चिली

Soyabean Chilli : अशी बनवा चटपटीत सोयाबीन चिली

Subscribe

पनीर चिली खायला सर्वांनाच आवडते. आज आम्ही तुम्हाला चटपटीत सोयाबीन चिली कशी बनवायची हे सांगणार आहोत.

साहित्य :

  • 1 वाटी सोयाबीन वडी
  • 1 शिमला मिरची
  • 1 कांदा
  • 2 चमचे सोया सॉस
  • 1 चमचा टोमॅटो सॉस
  • 4 मोठे चमचे कॉर्नफ्लॉवर
  • आलं-लसूण
  • मीठ चवीनुसार
  • तेल

कृती :

Soya Chilli Recipe Made Easy - BON Masala & Food Products

  • गरम पाण्यात मीठ आणि सोयाबीन घालून भिजवून घ्यावे. त्यातील पाणी घट्ट पिळून काढून टाकावे.
  • आता एका बाऊलमध्ये कॉर्नफ्लॉवर घेऊन त्यात मीठ आणि पाणी घालून भिजवून घ्यावे. (मिश्रण जास्त पातळ किंवा जास्त घट्ट नसावे. त्यात सोयाबीन बुडवता येतील असे बनवावे)
  • एका कढईत तेल गरम करून सोयाबीन कॉर्नफ्लॉवरमध्ये बुडवून सोनेरी रंग होईपर्यंत तळून घ्यावे.
  • एका पॅनमध्ये तेल गरम करून त्यात आलं-लसूण चिरून घालावे.
  • त्यानंतर कांदा आणि शिमला मिरची परतून घ्यावी. कांदा व मिरची जास्त परतू नये, थोडे कच्चे राहू द्यावे.
  • नंतर त्यामध्ये सोया सॉस, टोमॅटो सॉस आणि मीठ घालून परतून घ्यावे.
  • नंतर तळलेले सोयाबीन घालून परतून घ्यावे.
  • आता तयार सोयाबीन चिली सर्वांना सर्व्ह करा.

हेही वाचा :

Recipe: घरी बनवा कोरियन मिरचीचे तेल

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -

Manini