ड्राय फ्रूट मिल्क शेक चवीसोबतच आरोग्याच्या दृष्टीनेही खूप फायदेशीर आहे. ड्राय फ्रुट्स मिल्क शेक बनवायला देखील खूप सोपं आहे आणि ड्राय फ्रुट्स मिल्क शेक काही मिनिटात तयार करता येतो.
साहित्य :
- 4 अक्रोड
- 7 बदाम
- 7-8 काजू
- 1 चमचे मध
- 1 ग्लास दूध
- केशराची पाने (प्रमाणानुसार)
कृती :
- सर्वप्रथम दूध उकळून मग थंड करून घ्या. यानंतर एका प्लेटमध्ये काजू, बदाम आणि अक्रोड फोडून त्याचे दाणे काढून घ्या.
- हे झाल्यावर काजू, बदाम, अक्रोड आणि दूध ग्राइंडरमध्ये बारीक करून घ्या.
- आता बारीक झालेल्या मिश्रणात मध घाला आणि ते चांगले ढवळून घ्या.
- हे घट्ट मिश्रण ड्रायफ्रुट्सच्या तुकड्यांनी सजवा.
- शेवटी ड्रायफ्रुट शेकवर केशर टाका आणि सर्व्ह करा.