Saturday, March 15, 2025
HomeमानिनीMakeup Hacks : ग्लॅमरस दिसण्यासाठी झटपट मेकअप हॅक्स

Makeup Hacks : ग्लॅमरस दिसण्यासाठी झटपट मेकअप हॅक्स

Subscribe

प्रत्येक महिलेला मेकअप करायला आवडतो. मेकअप केल्यानंतर प्रत्येक स्त्रीचा लूक वेगळाच दिसतो. कोणत्याही कार्यक्रमाला जाण्यापूर्वी आपण आपला लूक सुंदर आणि ग्लॅमरस बनवण्यासाठी मेकअपची मदत घेतो. जोपर्यंत मेकअप योग्य प्रकारे केला जात नाही तोपर्यंत आपला लूक परिपूर्ण दिसत नाही. आजकाल सर्वांना साधारण मेकअप कसा करायचा हे माहित आहे. तसेच, मेकअप करताना वापरल्या जाणाऱ्या उत्पादनांबद्दल देखील सर्वांना माहिती आहे, परंतु याव्यतिरिक्त, मेकअप करण्याची योग्य पद्धत आणि ते करण्यासाठी काही आवश्यक टिप्स सर्वांनाच माहिती नसतात. आज या लेखात जाणून घेऊयात की मेकअप करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत आणि कोणत्या स्मार्ट हॅक्सच्या मदतीने तुम्ही सहज आणि जलद मेकअप करू शकता.

फाउंडेशनऐवजी कन्सीलर वापरा

बऱ्याचदा मेकअप करताना आपल्याला फाउंडेशन, कन्सीलर, प्राइमर आणि कॉम्पॅक्टची आवश्यकता असते. या सर्व गोष्टी मूलभूत आहेत. मात्र जर तुमचं फाउंडेशन संपलं असेल किंवा तुम्हाला ते सापडत नसेल, तर तुम्ही तुमच्या संपूर्ण चेहऱ्यावर कन्सीलर वापरू शकता. यामुळे तुमच्या चेहऱ्यावर एक परिपूर्ण चमक येईल.

विंग लाइनर कसे लावायचे ?

जर तुम्हाला विंग लाइनर लावताना परिपूर्ण आऊटलाइन मिळत नसेल, तर प्रथम अँगल ब्रशच्या मदतीने ते मार्क करून घ्या. आता तुम्ही त्या मार्कच्या मदतीने विंग लाइनर सहजपणे लावू शकता. काही लोक डोळ्यांवर टेप चिकटवूनही लाइनर लावतात. यामुळे लाइनर अगदी व्यवस्थित डोळ्यांना लागते.

Makeup Hacks : Quick Makeup Hacks to Look Glamorous

नैसर्गिक ओठांसाठी करा हे उपाय 

जर तुम्हाला लिपस्टिक लावायची नसेल आणि चमकदारओठ हवे असतील तर त्यासाठी कोणताही लिप बाम घ्या आणि त्यात हलक्या रंगाची लिपस्टिक किंवा टिंट मिसळा. तुम्ही ते ब्रशच्या मदतीने ओठांवर लावू शकेल.ज्यामुळे तुमचे ओठ नैसर्गिकरित्या गुलाबी भासतील.

पसरलेली लिपस्टिक किंवा लाइनर कशी स्वच्छ कराल?

जर तुमची लाइनर किंवा लिपस्टिक लावताना पसरली किंवा चुकीच्या पद्धतीने लावली गेली तर ती साफ करण्याकरता
एक इअरबड घ्या आणि ते पाण्यात बुडवा, नंतर डाग असलेली जागा हळूवारपणे इअरबडने स्वच्छ करा. याशिवाय, तुम्ही कॉम्पॅक्टच्या मदतीने देखील डाग काढू शकता.

पाऊट बनवून ब्लश लावा

ब्लश लावण्यासाठी, नेहमी प्रथम एक पाउट बनवा आणि नंतर ब्लेंडिंग ब्रशच्या मदतीने ते वरपासून खालपर्यंत ब्लेंड करा. असे केल्याने ब्लश योग्य ठिकाणी लावला जाईल. याशिवाय, तुम्ही तुमच्या हाताच्या मदतीने अर्धा चेहरा झाकून देखील ब्लश लावू शकता.

हेही वाचा : Vastu Tips : घरात कासवाची मूर्ती ठेवण्याचे नियम


Edited By – Tanvi Gundaye

Manini