जर तुम्ही दररोज मेकअप करत असाल तर तुमच्या मेकअप किटमध्ये अनेक प्रकारचे ब्युटी प्रोडक्ट्स असतीलच, पण तुम्ही कधी विचार केला आहे का की तुमच्या किटमध्ये असे काही प्रोडक्ट्स असू शकतात जे तुमच्या त्वचेला हानी पोहोचवू शकतात? काही मेकअप उत्पादने तुमच्या त्वचेसाठी हानिकारक असू शकतात आणि ती ताबडतोब काढून टाकणे आवश्यक आहे. जाणून घेऊयात अशा काही गोष्टींविषयी ज्या आपल्या मेकअप किटमधून काढून टाकल्यास त्याचे दुष्परिणाम भोगावे लागणार नाहीत.
एक्स्पायर्ड मेकअप प्रोडक्टस :
मेकअप उत्पादनांनाही एक्सपायरी डेट असते, परंतु लोक अनेकदा त्याकडे दुर्लक्ष करतात. कालबाह्य झालेली उत्पादने तुमच्या त्वचेवर योग्यरित्या काम करत नाहीत उलट त्यामुळे त्वचेची अॅलर्जी, पुरळ आणि संसर्ग देखील होऊ शकतात. म्हणून, तुमच्या किटमध्ये ठेवलेल्या उत्पादनांची एक्सपायरी डेट वेळोवेळी तपासत राहा आणि जुन्या झालेल्या वस्तू फेकून द्या.
तुटलेले किंवा जुने झालेले मेकअप ब्रशेस :
तुमच्या मेकअप ब्रशेसमध्ये किती धूळ, बॅक्टेरिया आणि जुना मेकअप जमा होतो याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? या बॅक्टेरियामुळे तुमच्या चेहऱ्यावर मुरुमे येऊ शकतात आणि संसर्ग होऊ शकतो. जर तुमचा ब्रश खूप जुना, तुटलेला किंवा घाणेरडा झाला तर तो ताबडतोब बदला आणि ब्रश नियमितपणे स्वच्छ करा.
वाळलेला मस्कारा आणि लिक्विड लाइनर :
मस्कारा आणि लिक्विड लाइनर कोरडे पडणे ही एक सामान्य समस्या आहे, काही महिला यात पाण्याचे काही थेंब टाकून ते पुन्हा वापरण्याचा प्रयत्न करतात जे अत्यंत चुकीचे आहे. वाळलेल्या मस्करात बॅक्टेरिया वाढू शकतात, ज्यामुळे डोळ्यांना संसर्ग होऊ शकतो. म्हणून जर तुमचा मस्कारा सुकला असेल तर तो फेकून देणेच चांगले.
खूप जुनी लिपस्टिक किंवा लिप बाम :
लिपस्टिक आणि लिप बामची देखील एक्स्पायरी डेट असते आणि जर ते खूप जुने झाले असतील तर त्यांचा असाच वापर करणे तुमच्या ओठांना हानी पोहोचवू शकते. जुन्या लिपस्टिकमध्ये बॅक्टेरिया असू शकतात, ज्यामुळे ओठ फाटू शकतात किंवा जळजळ होऊ शकते. जर तुमच्या लिपस्टिकचा वास किंवा पोत बदलला असेल तर ती ताबडतोब फेकून द्या.
ब्रँड नसलेला किंवा कमी दर्जाचा मेकअप :
स्वस्त आणि ब्रँड नसलेली मेकअप उत्पादने तुमच्या त्वचेसाठी अत्यंत हानिकारक असू शकतात. यामध्ये हानिकारक रसायने असतात, ज्यामुळे ऍलर्जी, खाज सुटणे आणि त्वचेच्या इतर समस्या उद्भवू शकतात . नेहमी चांगल्या आणि विश्वासार्ह ब्रँडची उत्पादने वापरा आणि कमी दर्जाच्या उत्पादनांना लगेच निरोप द्या.
तुमचा मेकअप किट सुरक्षित कसा बनवाल?
दर 6 महिन्यांनी तुमचा मेकअप किट स्वच्छ करा आणि एक्स्पायर्ड झालेल्या वस्तू फेकून द्या.
मेकअप ब्रशेस आणि ब्लेंडर नियमितपणे धुवा.
फक्त ऑर्गेनिक आणि चांगल्या दर्जाची मेकअप उत्पादने वापरा.
तुमचा मेकअप, विशेषतः लिपस्टिक आणि डोळ्यांसाठीची उत्पादने इतरांसोबत शेअर करणे टाळा.
नवीन वस्तू खरेदी करण्यापूर्वी, त्या तुमच्या त्वचेच्या प्रकारासाठी योग्य आहेत की नाही ते तपासा.
हेही वाचा : Pomegranate Peel : डाळिंबाच्या सालीचा असा करा वापर
Edited By – Tanvi Gundaye