Monday, December 4, 2023
घरमानिनीBeautyमेकअपच्या 'या' चुकांमुळे बिघडेल लूक

मेकअपच्या ‘या’ चुकांमुळे बिघडेल लूक

Subscribe

मुलींना मेकअप करणे फार आवडते. असे सुद्धा म्हटले जाते की, दागिन्यांसह त्यांना साज-श्रृंगाराच्या सामानाप्रति त्यांना एक वेगळीच ओढ असते. मुली महागडे मेकअप प्रोडक्ट्स खरेदी करतात. पण तरीही उत्तम रिजल्ट मिळत नाही आणि लूक बिघडला जातो. याच कारणास्तव एखाद्या खास कार्यक्रमावेळी लूक अधिक खुलून दिसावा म्हणून पार्लरमध्ये जाऊन हजारो रुपये खर्च केले जातात. परंतु प्रोडक्टच्या क्वालिटीसह मेकअप करताना काही गोष्टींची काळजी घेतली तर परफेक्ट लूक जरुर मिळेल.खरंतर मेकअप करताना काही कॉमन मिस्टेकमुळे तुमचा लूक बिघडल जाऊ शकतो.

मॉश्चराइजर न लावणे
बहुतांश मुली ही चूक करतात की, त्या मेकअप करण्यापूर्वी चेहऱ्याला मॉइश्चराइजर लावत नाही. कारण त्यांना वाटते की, यामुळे चेहरा तेलकट होईल. चेहऱ्यावर मॉइश्चराइजर लावल्याने मेकअपचा बेस उत्तम प्रकारे ब्लेंड होतो. त्यामुळे लूक फ्लॉलेस होण्यास मदत होते.

- Advertisement -

चुकीचे फाउंडेशन निवडणे
मेकअपचा बेस फाउंडेशन असतो. उत्तम क्वालिटीचा फाउंडेशन घेण्यासह तुम्ही हे सुद्धा पाहिले पाहिजे की, तो तुमच्य स्किन टोनल मॅच होतोय की नाही. जर तुमची स्किन डार्क असेल आणि तुम्ही लाइन कलर निवडला तर चेहरा पांढरा दिसेल.

5 Makeup Mistakes That Worsen Your Acne According to a Dermatologist

- Advertisement -

व्यवस्थितीत ब्लेंड न करणे
मेकअप ब्लेंड करण्यासाठी ब्युटी ब्लेंडरचा वापर केला जातो. पण फाउंडेशन क्रिम ब्युटी ब्लेंडरने व्यवस्थितीत ब्लेंड केले नाही तर चेहऱ्यावर पॅच दिसतात. यासाठी तुम्ही एक ट्रिक वापरू शकता. ब्युटी ब्लेंडर ओलसर करून व्यवस्थितीत पिळून घ्या आणि हलका सुकवा. केवळ लक्षात ठेवा ब्लेंडरमध्ये थोडासा ओलसरपणा असावा.

मेकअप केकी होण्याचे कारण
मेकअपचा बेस लावताना तो व्यवस्थितीत ब्लेंड करावा, पुन्हा त्यावर लेअर लावू नका. जर तुम्ही ही चूक करत असाल तर काही वेळानंतर मेकअपला क्रॅक आल्यासारखे दिसेल. याच कारणास्तव तुमचा लूक बिघडला जाईल.

योग्य लिपस्टिक शेड्स निवडा
लिपस्टिक तुमच्या लूकला पूर्णपणे वेगळा लूक देतो. यासाठी अत्यंत गरजेचे आहे की, तुम्ही योग्य शेडची लिपस्टिक निवडा. जर तुमची लिपस्टिक ग्लॉसी नसेल आणि ओठ ड्राय असतील तर आधी मॉइश्चराइजरलावा आणि त्यानंतर काही वेळाने लिपस्टिक लावा.


हेही वाचा- थंडीत स्किन ड्राय झाल्यास करा ‘हा’ छोटा उपाय

- Advertisment -

Manini