लिपस्टिक तुमचा मेकअप पूर्ण करते आणि लिपस्टिक लावल्यानंतर तुम्ही अधिक सुंदर व आकर्षक दिसता. यासाठी महिला लिपस्टिकची निवड खूप विचारपूर्वक करतात. बाजारात तुम्हाला अनेक शेड्समध्ये लिपस्टिक सहज उपलब्ध होऊ शकतात. पण, जर तुमची त्वचा थोडी सावळी असेल तर तुम्ही सुंदर दिसण्यासाठी या लेखातील काही लिपस्टिक शेड्सचा विचार करू शकता.
डीप रेड :
गडद लाल रंगाची लिपस्टिक डस्की स्किन असणाऱ्या महिलांवर अधिक खुलून दिसते. तुम्ही या प्रकारची लिपस्टिक अनेक खास प्रसंगी लावू शकता ज्यामुळे तुमचा लूक ग्लॅमरस होण्यास मदत होईल. जर तुम्हाला जास्त गडद लाल रंग आवडत नसेल तर तुम्ही या रंगात हलका लाल रंग वापरून पाहू शकता.
केशरी-लाल शेड्स :
जर तुम्हाला इतरांपेक्षा वेगळे दिसायचे असेल, तर तुम्ही तुमच्या आउटफिटनुसार ऑरेंज-रेड शेड्स असलेली लिपस्टिक निवडू शकता. हा रंग तुमच्या लूकला स्टायलिश बनवण्याचे काम करेल.
गडद वाइन :
तुमच्या आउटफिटनुसार तुम्ही या प्रकारची लिपस्टिक निवडू शकता. अशा प्रकारची लिपस्टिक लावल्यानंतर तुमचा लूक सुंदर तर दिसेलच आणि तुम्ही गर्दीतून वेगळेही दिसू शकाल. रात्रीच्या फंक्शन्स किंवा पार्टीकरता तुम्ही अशा प्रकारची लिपस्टिक निवडू शकता आणि ही लिपस्टिक लावल्यानंतर तुमचा लूक अॅट्रॅक्टिव्ह दिसण्यास मदत होईल.
कॉपर ब्राउन :
कॉपर ब्राउन लिपस्टिक शेड डार्क रंगाच्या स्कीन टोनसाठी आकर्षक दिसू शकते. या प्रकारची शेड सहजरित्या त्वचेच्या टोनशी मॅच होते. ही शेड तुम्ही सहज खास कार्यक्रमांकरिता वापरू शकता.
रोज पिंक :
डिप रोज पिंक कलर डस्की कॉम्प्लेशनवर खूपच शोभून दिसतो. लाईट शेड असो वा डार्क शेड दोन्ही शेड्स तुमच्या डस्की स्किनला परफेक्ट दिसू शकतात.
या गोष्टीही लक्षात ठेवा :
जर तुम्हाला तुमची लिपस्टिक जास्त काळ टिकून राहावी असं वाटत असेल तर तुम्ही लिक्विड वॉटरप्रूफ लिपस्टिक निवडू शकता. लिपस्टिकची शेड निवडण्याआधी तुम्ही ती हातावर लावून बघू शकता. जेणेकरून ती तुमच्या त्वचेवर कशी दिसते हे कळू शकेल.
डस्की स्किन टोनसाठी, या लेखात नमूद केलेल्या शेड्स तुमची त्वचा सुंदर बनवण्यासाठी योग्य पर्याय ठरू शकतात.
हेही वाचा : Health Tips : मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी सोशल मीडियापासून राहा दूर
Edited By – Tanvi Gundaye