मेकअप हा आता एक महत्वाचा भाग झाला आहे. कोणत्याही खास प्रसंगी आपण मेकअप केल्याशिवाय बाहेर पडत नाही आणि आपला लूक देखील परिपूर्ण वाटत नाही. बऱ्याचवेळा ऑफिस पार्टीला किंवा लग्नाला जाण्यासाठी आपण पार्लरमध्ये जाणून मेकअप करतो. परंतु ऑफिस किंवा कॉलेजला जायचं असेल तर स्वतः तयारी करतो. बऱ्याचवेळा अनेक महिलांना काही मेकअप टिप्स माहित नसतात. त्यामुळे आपला लूक खास देखील दिसत नाही. त्यामुळे आज आपण काही मेकअप टिप्स जाणून घेऊयात.
फाउंडेशन लावण्याआधी आय शैडो लावा
अनेक महिला या आधी फाउंडेशन लावतात त्यानंतर आय शैडो परंतु हे करणे चुकीचे आहे. यामागचं कारण म्हणजे फाउंडेशननंतर आयशॅडो लावल्याने चेहऱ्यावर पसरते ज्यामुळे तयार केलेला बेस खराब होऊ शकतो. म्हणून आधी आय शैडो लावा नंतर फाउंडेशन.
प्राइमर लावायला विसरू नका
मेकअप करण्यापूर्वी प्राइमर लावणे अत्यंत गरजेचं आहे. प्राइमर लावल्यामुळे मेकअप आपल्याला त्वचेच्या आत जाणार नाही. प्राइमर हे एका ग्लू प्रमाणे असते त्यामुळे मेकअप दीर्घकाळ राहतो. मॉइश्चरायझर लावल्यानंतर १०-१५ मिनिटांनी प्रायमर लावा.
बेस फाउंडेशन म्हणून कन्सिलरचा वापर करू नका
डोळ्यांखालील काळे डाग लपवण्यासाठी कन्सिलरचा वापर केला जातो. परंतु हे करू नका कन्सिलरमुळे तुमची त्वचा कोरडी होऊ शकते. ज्यामुळे तुमच्या त्वचेला नुकसान होते आणि तुमचा मेकअप देखील खराब होऊ शकतो.
स्किनटोन प्रमाणे फाउंडेशन निवडा
आपल्या त्वचेला मॅच होईल असे फाउंडेशनची निवड करा. बऱ्याचदा अनेक महिला या आपल्या स्किनटोन पेक्षा वेगळ्या फाउंडेशनची निवड करतात त्यामुळे ते मिस अँड मॅच वाटू शकते. त्यामुळे फाउंडेशन खरेदी करताना ते तुमच्या त्वचेला मॅच होत का ते आधी तपासून बघा.
लिपस्टिक
लिपस्टिक दीर्घकाळ टिकण्यासाठी लिपस्टिक लावल्यानंतर त्यावर टिश्यू पेपर ठेवा आणि नंतर टिश्यू काढा अशाप्रकारे तुमची लिपस्टिक दिवसभर तशीच राहील
स्मोकी आय मेकअप
सेलिब्रिटीस नेहमीच आपलं लक्ष वेधून घेतात. हे त्यांच्या फॅशन स्टाइलमुळे नव्हे तर मेकअपमुळे. जर तुम्हाला सेलिब्रिटी सारखा लूक करायचा असेल तर डोळ्यांना स्मोकी मेकअप करा. स्मोकी आय मेकअपमुळे खूप आकर्षक आणि सुंदर दिसतात.
हेही वाचा : Beauty Tips : मेक – अप करताना टाळा या चुका
Edited By : Prachi Manjrekar