Monday, December 11, 2023
घरमानिनीKitchenMakhana Barfi : यंदाच्या दिवाळीला बनवा मखाना बर्फी

Makhana Barfi : यंदाच्या दिवाळीला बनवा मखाना बर्फी

Subscribe

अनेकांना वेगवेगळ्या मिठाई खायला आवडतात. सण-समारंभावेळी बाजारातील काही मिठाई भेसळयुक्त असतात.  अशावेळी तुम्ही घरीच मखाना बर्फी बनवू शकता.

साहित्य :

  • 100 ग्रॅम मखाने
  • 1 वाटी नारळ पावडर
  • 1 वाटी शेंगदाणे
  • 1 पाकिट दूध पावडर
  • 300 ग्रॅम दूध
  • 1/2 वाटी साखर
  • 5-6 वेलची

कृती :

Makhana Peanut Coconut Barfi – Tanu's Kitchen

  • सर्वप्रथम बर्फी बनवण्यासाठी मखाने नॉन-स्टिक पॅनमध्ये भाजून घ्या.
  • त्यानंतर त्यामध्ये शेंगदाणे घालून साधारण 4-5 मिनिट परता.
  • आता हे मिश्रण मिक्सरमध्ये टाकून बारीक करा.
  • दुसरीकडे एका भांड्यात दूध गरम करा आणि त्यात साखर टाका.
  • दूधाला उकळी आल्यावर त्यामध्ये मखान्याचे मिश्रण टाका सोबतच त्यात मिल्क पावडर देखील मिक्स करा.
  • आता हे सर्व मिश्रण एकसारखे ढवळा.
  • मिश्रम घट्ट झाल्यावर एका प्लेटमध्ये काढा आणि सेट करण्यासाठी ठेवा.
  • हे मिश्रण काही वेळाने गोठल्यासारखे होईल तेव्हा त्याने बर्फी प्रमाणे बारीक काप करून घ्या.

हेही वाचा : Diwali Recipe : यंदा घरीच बनवा काजू कतली

- Advertisment -

Manini