घरलाईफस्टाईलहिवाळ्यात मेकअप करतांना

हिवाळ्यात मेकअप करतांना

Subscribe

मेकअप हा प्रत्येक महिलेचा जिव्हाळ्याचा विषय असतो. सध्या प्रत्येक महाविद्यालयीन तरुणी असो, किंवा नोकरी करणार्‍या महिला असो साधारण सगळ्यांना मेकअप करायला आवडतोच. हिवाळ्यात पडणार्‍या थंडीमुळे त्वचा कोरडी आणि शुष्क होते. अशावेळी मेकअप करण्यापूर्वी आणि केल्यानंतर कोणती काळजी घेतली पाहिजे. त्या विषयी..

*दिवसा बाहेर पडणार असाल तर चेहर्‍यावर अतिशय हलका मेकअप करा. मेकअप करण्यापूर्वी त्वचा स्वच्छ असणं गरजेचं आहे. त्वचा स्वच्छ ठेवण्यासाठी तुमच्या त्वचेला सूट होणारा फेसवॉश किंवा क्लीनजरनं चेहरा स्वच्छ करून घ्या. कोमट पाण्याने चेहरा धुतल्यानंतर तो व्यवस्थित कोरडा करा.

- Advertisement -

*मेकअपसाठी लागणारं साहित्य ब्रँडेड कंपन्यांचेच वापरा. स्वस्तात मिळणार्‍या साहित्यांची निवड करणं टाळा. मेकअप साहित्याची अलर्जी असेल तर ते कोणत्याही कारणास्तव ते वापरू नका. त्यामुळे त्वचेवर वाईट परिणाम देखील होऊ शकतो.

*हिवाळ्यात संध्याकाळी बाहेर पडताना तापमान कमी असल्याने या वातावरणातही त्वचेवर ओलावा राहण्यासाठी मॉस्च्युरायझरचा वापर करा. त्वचा खूपच ऑईली असेल तर जेल प्रॉडक्टस् वापरा.

- Advertisement -

*तुमची त्वचा खूपच शुष्क किंवा कोरडी असेल तर स्कीन हायड्रेटिंग क्रीमचा वापर करा.

*आपल्या स्किनचा टोन आणि प्रकार पाहून योग्य असेल असाच मेकअप करा. तुमच्या त्वचेनुसार प्रायमर आणि लोशन यांचा वापर करा. डोळ्यांखाली काळी वर्तुळं असतील तर डोळ्यांभोवती अधिक मेकअपचा थर चढवू नका. डोळ्यांभोवतीची त्वचा फारच नाजूक असते. त्यामुळे तिला इन्फेक्शन झाल्यास ते डोळ्यांसाठी त्रासदायक ठरू शकतं.

*मेकअप करताना फाउंडेशमध्ये फेस ऑइल किंवा बदाम तेलाचे दोन-चार थेंब टाकून ते त्वचेलवर अप्लाय करा.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -