Monday, March 17, 2025
HomeमानिनीHealthMale Menopause : महिलांप्रमाणेच पुरुषांनाही होतो मेनोप़ॉज

Male Menopause : महिलांप्रमाणेच पुरुषांनाही होतो मेनोप़ॉज

Subscribe

महिलांमध्ये असलेल्या रजोनिवृत्तीबद्दल तुम्हाला कदाचित माहिती असेल की त्यांना 45-55 वर्षांच्या वयात रजोनिवृत्ती येते, म्हणजेच मासिक पाळी येणे थांबते. हे एस्ट्रोजेन हार्मोनच्या कमतरतेमुळे होते. त्याचप्रमाणे, वाढत्या वयाबरोबर पुरुषांमध्येही काही हार्मोनल बदल होतात. पण रजोनिवृत्तीसारखे काही पुरुषांमध्येही होते का आणि त्यांच्यातही स्त्रियांप्रमाणे हार्मोन्समध्ये अचानक घट होते का? याबाबत जाणून घेण्यासाठी आम्ही डॉक्टरांशी बोललो. पुरुष रजोनिवृत्तीबद्दल त्यांनी कोणती माहिती शेअर केली ते जाणून घेऊया.

पुरुष रजोनिवृत्ती म्हणजे काय?

पुरुषांमध्ये देखील रजोनिवृत्तीसारखे बदल होतात, ज्याला एंड्रोपॉज किंवा पुरुष रजोनिवृत्ती म्हणतात. टेस्टोस्टेरॉनची पातळी कमी झाल्यामुळे हे घडते. परंतु स्त्रियांप्रमाणे, हे अचानक सुरू होत नाही, तर हळूहळू होते. वयाच्या ३० वर्षांनंतर पुरुषांमध्ये टेस्टोस्टेरॉन हार्मोनची पातळी हळूहळू कमी होऊ लागते. दरवर्षी ते सरासरी 1 टक्क्यांनी कमी होतात. तथापि, वाढत्या वयानुसार, कधीकधी टेस्टोस्टेरॉन हार्मोनची पातळी इतर कारणांमुळे देखील कमी होऊ शकते.

पुरुष रजोनिवृत्तीची लक्षणे :

45 वर्षे ते 55 वर्षे वयोगटातील पुरुषांमध्ये एंड्रोपॉज किंवा पुरुषी रजोनिवृत्ती अधिक प्रमाणात दिसून येते. टेस्टोस्टेरॉन हार्मोन्स कमी झाल्यामुळे थकवा, नैराश्य, चिडचिड, लैंगिक इच्छा कमी होणे, इरेक्टाइल डिसफंक्शन यांसारखी लक्षणे दिसतात. वाढत्या वयाबरोबर हार्मोन्स कमी झाल्यामुळे असे घडते, परंतु इतर कारणे देखील त्यामागे असू शकतात, जसे की तणाव, खराब जीवनशैली किंवा आरोग्याशी संबंधित कोणतीही समस्या.

Male Menopause: Like women, men also undergo menopause

पुरुषांच्या रजोनिवृत्तीचे व्यवस्थापन कसे करता येईल ?

पुरुष रजोनिवृत्तीत देखील स्त्रियांप्रमाणे त्यांची काळजी घेतली जाऊ शकते. त्याचे व्यवस्थापन करण्याचे उपाय म्हणजे जीवनशैली बदलणे आणि डॉक्टरांची मदत घेणे.

जीवनशैलीत बदल :

फळे, भाज्या, प्रथिने आणि धान्य यांचा समावेश असलेला संतुलित आहार घेतल्याने थकवा टाळता येतो आणि संपूर्ण आरोग्याला चालना मिळते. संतुलित आहार घेतल्याने हार्मोन्सच्या असंतुलनामुळे होणाऱ्या आरोग्याच्या समस्या कमी होण्यास मदत होईल. त्याचप्रमाणे नियमित व्यायाम करण्याकडे लक्ष द्या.स्ट्रेथ ट्रेनिंग आणि कार्डियोवॅस्क्युलर एक्सरसाइज केल्याने फायदे मिळू शकतात. यामुळे मसल लॉस रोखता येईल. सोबतच मूडही सुधारेल.

तणाव कमी करा :

ध्यान, योग आणि माइंडफुलनेसच्या मदतीने तणाव कमी होण्यास मदत होईल आणि मानसिक आरोग्य देखील सुधारेल . याव्यतिरिक्त, चांगली झोप घेतल्याने तणाव कमी होण्यास नक्कीच मदत होते . त्यामुळे 7-8 तासांची झोप नक्कीच घ्या.

हार्मोन रिप्लेसमेंट थेरपी :

टेस्टोस्टेरॉनच्या कमतरतेवर मात करण्यासाठी हार्मोन रिप्लेसमेंट थेरपी फायदेशीर ठरू शकते. मात्र त्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांना भेटून त्याच्याशी संबंधित धोके आणि फायद्यांविषयी संपूर्ण माहिती मिळवा आणि त्यानंतरच निर्णय घ्या. तसेच, तुमच्या टेस्टोस्टेरॉनची पातळी आणि आरोग्याची नियमित तपासणी करा.

सायकोलॉजिस्टची मदत घ्या :

मूड स्विंग्स आणि एंड्रोपॉजमुळे होणारे नैराश्य दूर करण्यासाठी समुपदेशन किंवा थेरपीची मदत घेणे फायदेशीर ठरू शकते. अशा परिस्थितीत, सपोर्ट ग्रुपदेखील उपयुक्त ठरू शकतात, कारण ते तुम्हाला जाणवून देतात की तुम्ही एकटे नाही आहात.

रिहॅबिलिटेशन :

तुम्ही तुमच्या डॉक्टरांशी बोलून स्वतःसाठी रिहॅबिलिटेशन प्लान बनवू शकता. हे एंड्रोपॉजची लक्षणे कमी करण्यास मदत करू शकते.यामुळे इरेक्टाइल डिसफंक्शन सारख्या समस्या देखील कमी होतात.

परंतु या सर्वांमध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर तुम्हाला एंड्रोपॉजची लक्षणे जाणवत असतील तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांशी बोलून त्यांच्याशी बोलल्यानंतरच उपचार योजना बनवा.

हेही वाचा : Health Tips : आरोग्यासाठी किती फायदेशीर आहे संध्याकाळाचा चहा ?


Edited By – Tanvi Gundaye

Manini