घरलाईफस्टाईलहे मॅंगो ड्रिंक्स नक्की ट्राय करा!

हे मॅंगो ड्रिंक्स नक्की ट्राय करा!

Subscribe

कडक उन्हाळ्यात शरिरास थंडावा मिळावा यासाठी बजारातील कोल्डड्रिग्स मोठ्या प्रमाणात घेतले जाते ते आरोग्यास हानिकारक ठरते. त्यामुळे घरीच अशी पेय पदार्थ नक्कीच ट्राय करुन पहा.

सध्या आंब्याचा सिजन सुरु आहे आणि रसरशीत आंबा हा सर्वांच्याच पसंतीचा आहे. आंबा प्रत्येक स्वरुपात खायला आपल्याला आवडतो. आपण रस बनवून किंवा फक्त आंबा या स्वरुपात आंबा खात असतो. परंतु याचे काही पदार्थ बनवून खाल्ल्याने यांची चव अजून आनंद देते. जेव्हा आपण उन्हातून घरी आल्यावर अतिशय दमलेलो असतो, आशावेळी काहीतरी थंड पेय घ्यावेसे वाटते. कडक उन्हाळ्यात शरिरास थंडावा मिळावा यासाठी बजारातील कोल्डड्रिग्स मोठ्या प्रमाणात घेतले जाते ते आरोग्यास हानिकारक ठरते. त्यामुळे घरीच अशी पेय पदार्थ नक्कीच ट्राय करुन पहा.

मँगो-केसर लस्सी

साहित्य

- Advertisement -

दही २०० मिली, आंब्याचा रस १ कप, दूध ३ ते ४ कप, केसर १२ ते १५ काड्या ( दुधात भिजवून ), साखर ६ स्पून (आवडीनुसार कमी-जास्त ), वेलची पूड २ चिमुट, बदाम, पिस्त्याची भरड सजावटीसाठी

कृती

- Advertisement -

सर्वात अगोदर आंब्याचा रस मिक्सरमधून फिरवून घ्या. त्याच मिक्सरच्या भांड्यात दही, दूध,साखर, केसर व वेलची पूड घालून सर्व साहित्य एकजीव होईपर्यंत फिरवून घेतल्यानंतर तयार लस्सी फ्रीजमध्ये थंड करण्यास ठेवावी . सर्व्ह करताना ग्लासेसमध्ये लस्सी ओतून घ्यावी व वरून बदाम पिस्त्याची भरड घालावी.

कैरी-लिंबाचं सार

साहित्य

एका कैरीचा कीस मिक्सरवर वाटून (किंवा एका लिंबाचा रस किंवा आमसूल सहा-सात), गूळ अर्धी वाटी, चार-पाच लाल मिरच्या, मीठ, कढीपत्ता, फोडणीसाठी तेल, हिंग, जिरे, चार कप पाणी.

कृती

पातेलीत एक मोठा चमचा तेल घ्यावं. त्यात मिरच्या, जिरे, हिंग, कढीपत्ता घालून फोडणी करावी. त्यात पाणी घालून उकळी आल्यावर लिंबाचा रस (किंवा कैरीचा गर किंवा आमसूल) घालावा. गूळ (किंवा साखर) व मीठ घालून उकळावं. आमसूल असल्यास काढून टाकावी. आजारपणात किंवा मूगडाळीच्या खिचडीबरोबर छान लागतं.
………….

मँगो वॉटरमेलन स्मूदी

साहित्य

दोन ते तीन कप कलिंगडाच्या फोडी, एका आंब्याच्या फोडी, एक ते दोन टे.स्पून साखर, अर्धा कप पाणी किंवा बर्फाचे तुकडे.

कृती

दोन्ही फळे व साखर ब्लेंड करून घेणे. ग्लासमध्ये बर्फ किंवा थंड पाणी घालणे त्यावर हा पल्प ओतून स्मूदी प्यायला देणे.

….

मँगो सालसा

साहित्य

आंब्यांच्या बारीक फोडी, एक लिंबाचा रस, टॉमेटोचे बारीक तुकडे, एक कांदा- खूप बारीक चिरलेला, बारीक चिरलेली कोथिंबीर, चवीप्रमाणे मीठ व मीरपूड.

कृती

एका बाउलमध्ये सर्व पदार्थ एकत्र करून त्यात मीठ व मीरपूड घालावी त्यामुळे चव वाढून मँगो सालसा खाण्यासाठी तयार.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -