Monday, January 13, 2025
HomeमानिनीFashionMangtikka Designs : चेहऱ्यानुसार निवडा बिंदीच्या डिझाईन्स

Mangtikka Designs : चेहऱ्यानुसार निवडा बिंदीच्या डिझाईन्स

Subscribe

असं म्हटलं जातं की शरीराच्या आकारानुसार स्टाईल करण्यात आलेले कपडे , मेकअप आणि दागिने तुमच्या लूकला अधिकच सुंदर बनवतात. नाहीतर तुमचा लूक खूपच वेगळा दिसू लागतो. अशात शरीरानुसार विचार करून सर्व गोष्टींची खरेदी करायला हवी. तरच आपण आपल्या लूकला अधिकच अॅट्रेक्टिव्ह बनवू शकतो. आऊटफिटसोबत सुंदर दागिने परिधान करणंही तितकंच गरजेचं असतं. जर तुम्ही एथनिक कपडे घालणार असाल तर त्यासोबत दागिन्यांचीही योग्य निवड करायला हवी.

सध्या लग्नाचा सीझन सुरू आहे. जर तुम्ही आऊटफिटसोबत सुंदर ज्वेलरी शोधत असाल तर या लेखातून आपण जाणून घेऊयात काही मांग टिक्का डिझाईन्स. तुमचा चेहरा बारीक असेल तर या मांग टिक्का डि़झाईन्स तुमच्यासाठी परफेक्ट ठरू शकतात.

- Advertisement -

चंद्रकळा डिझाईन :

Mangtikka Designs : Choose bindi designs according to your face
Chandrakala Design Mangtikka (Image Source : Social Media )

काही महिलांना असं वाटतं की त्यांचा चेहरा बारीक आहे त्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर मोठे दागिने सूट होणार नाहीत. परंतु हे चुकीचं आहे. तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर चंद्रकळा डिझाईन असलेली बिंदी ट्राय करू शकता. जर तुम्ही साडी किंवा लेहेंग्यावर हे ट्राय करत असाल तर तुम्हाला अगदी रॉयल लूक मिळू शकेल. या प्रकारच्या बिंदीमध्ये तुम्हाला कुंदन, कलरफुल बीडस् असे अनेक पर्याय मिळतील. तुम्ही या बिंदी ऑनलाईन किंवा ऑफलाईन दोन्ही प्रकारे खरेदी करू शकता.

लंबगोलाकृती डिझाईन :

Mangtikka Designs : Choose bindi designs according to your face
Oval Design Mangtikka (Image Source : Social Media )

स्लिम फेससाठी ओव्हल शेप बिंदी परफेक्ट ठरू शकते. यामध्ये तुम्हाला मोत्यांसोबतच क्रिस्टल स्टोनसुद्धा डिझाईनमध्ये मिळू शकेल. साडीच्या रंगाला मॅचिंग असणारे किंवा त्या रंगाला कॉन्ट्रास्ट असणारे खडेसुद्धा तुम्ही या बिंदीच्या डिझाईनमध्ये निवडू शकता. या प्रकारच्या बिंदी डिझाईन्स तुम्हाला 300 ते 1000 रूपयांपर्यंत सहज उपलब्ध होऊ शकतील.

- Advertisement -

बोडला डिझाईन :

Mangtikka Designs : Choose bindi designs according to your face
Bodala Design Mangtikka (Image Source : Social Media )

तसं पाहायला गेलं तर बोडला प्रकारची बिंदी राजस्थानी पारंपरिक ड्रेससोबत लोक परिधान करतात. परंतु सध्या सगळेच ही डिझाईन वापरू लागले आहेत. नववधूंची देखील या डिझाईनला चांगलीच पसंती मिळू लागली आहे. या प्रकारच्या डिझाईन्स गोल चेहऱ्याला अधिकच सुंदर वाटतात.

मिनिमल मीनाकारी बिंदी :

Mangtikka Designs : Choose bindi designs according to your face
Minimal Minakari Bindi Design Mangtikka (Image Source : Social Media )

जर तुम्हाला हेवी दागिने घालणे आवडत नसेल तर तुम्ही नाजूक दिसणाऱ्या या मिनिमल मीनाकारी बिंदीचा ऑप्शन ट्राय करू शकता. या प्रकारची बिंदी तुम्ही साडी किंवा लेहेंग्याप्रमाणे एथनिक आऊटफिटवरही परिधान करू शकता. या प्रकारची बिंदी सहजपणे डोक्यावर टिकून राहते. आणि सारखी सारखी पडत नाही. तुम्हाला ही बिंदी बाजारात 300 ते 800 रूपयांपर्यंत सहज मिळू शकेल.

हेही वाचा : Saree Draping Tips : साडी नेसताना करू नयेत या चुका


Edited By – Tanvi Gundaye

- Advertisment -

Manini