झेंडूचे फुल कोणत्याही सण-समारंभात सजावटीसाठी वापरले जाते. देव-देवतांनाही झेंडूच्या फुलांचा हार बनवला जातो. झेंडूच्या फुलांमध्ये ऍटी-ऑक्सिडंट, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी आढळते. झेंडूच्या फुलांमध्ये आढळणारी ही पोषकतत्वे केसांच्या तक्रारीवर रामबाण उपाय ठरतात. केसांसाठी नियमित झेंडू वापरल्याने केसगळती, केसांतील कोंडा, रुक्ष केस अशा समस्या कमी होतात. झेंडूच्या फुलांमध्ये व्हिटॅमिन ए, बी, आयर्न आणि ऍटी-ऑक्सिडंट आढळतात. ही पोषकतत्वे टाळू स्वच्छ करतात. झेंडूच्या फूलांमुळे केसातील कोंडा कमी होण्यास मदत मिळते. कोंडा दूर करण्यासाठी आणि केसगळती रोखण्यासाठी झेंडूच्या फुलांचा हेअर पॅक वापरणे फायद्याचे ठरेल.
हेअर पॅक –
- 6 ते 7 झेंडूची फुले घेऊन स्वच्छ धुवून घ्यावीत.
- झेंडूची फुले धुतल्यानंतर त्याच्या पाकळ्या वेगळ्या करून घ्याव्यात.
- पाकळ्या वेगळ्या केल्याने त्यातील घाण दूर होईल.
- एका पातेल्यात 2 ग्लास पाणी घेऊन मंद आचेवर गरम करून घ्यावे.
- पाणी गरम झाल्यावर त्यात झेंडूच्या पाकळ्या 10 मिनिटे उकळवून घ्याव्यात.
- पाणी अर्ध होईपर्यत गॅस बंद कर नये.
- तयार पाणी गाळून घ्यावे.
- पाकळ्याची पेस्ट बनवावी, त्यात तुम्ही चमचाभर एलोवेरा जेल देखील मिक्स करू शकता.
हेअर पॅक लावायचा कसा –
- तयार हेअर पॅक केसांच्या मुळाशी हलक्या हाताने लावावा.
- हळूवारपणे केसांना मसाज करावा.
- 15 ते 20 मिनिटे हेअर पॅक केसांवर तसाच असूद्या.
- 15 ते 20 मिनिटानंतर केस स्वच्छ पाण्याने धुवून घ्यावेत.
- कोंड्याच्या समस्यांपासून मुक्तता होण्यासाठी आठवड्यातून दोनदा झेंडूच्या फुलांचा हेअर पॅक तुम्ही केसांसाठी वापरायला हवा.
केसगळतीवर या पद्धतीने वापरावीत फुलं –
केसगळती रोखण्यासाठी एक कप पाण्यात 3 ते 4 झेंडूची फुले पाण्यात टाकून उकळवून घ्यावेत. तयार पाण्याने केस धुवावेत. आठवड्यातून किमान 2 ते 3 वेळा हा उपाय करू शकता. या उपायामुळे केसगळती थांबेल.
हेही पाहा –