Sunday, January 12, 2025
HomeमानिनीRelationshipMarriage Ritual : लग्नाआधीच वधू करते रडण्याची प्रॅक्टीस

Marriage Ritual : लग्नाआधीच वधू करते रडण्याची प्रॅक्टीस

Subscribe

तुम्हाला माहित आहे का की जगात अशी एक जागा आहे जिथे लग्न म्हणजे फक्त आनंद साजरा करणे नाही? होय, तसं पाहायला गेलं तर भारतातील विवाहसोहळा आनंदाने आणि वैभवाने भरलेला असतो, परंतु एका चिनी तुजिया नावाच्या जमातीत विवाह हा असा प्रसंग आहे जिथे वधूला खूप रडावे लागते. तसं पाहायला गेलं तर प्रत्येक वधू ही सासरी जाताना रडते

साहजिकच ही परंपरा तुम्हाला खूप विचित्र वाटेल, पण या जमातीचा असा विश्वास आहे की वधूचे रडणे लग्नाला शुभ करते. कल्पना करा, एकीकडे लग्नाचा दिवस हा आयुष्यातील सर्वात सुंदर दिवस असतो आणि दुसरीकडे या जमातीतील मुली एक महिना अगोदरच रडण्याचा सराव सुरू करतात अनेक वेळा घरातील लोक त्यांना जास्त रडायला लावतात आणि जर अश्रू बाहेर आले नाहीत तर नवरीची आई आपल्या मुलीला मारहाण करून रडायला लावते. या विचित्र प्रथेबद्दल आज आपण जाणून घेऊयात.

- Advertisement -

वधूच्या अश्रूंशिवाय लग्न अपूर्ण राहते :

भारतात लग्नाचे वातावरण आनंदाचे आणि उत्साहाचे असते. पण चीनच्या दक्षिण-पश्चिम प्रांत सिचुआनमध्ये राहणाऱ्या तुजिया जमातीचे लग्न पूर्णपणे वेगळे असतात. या जमातीचे लोक हजारो वर्षांपासून येथे राहत आहेत आणि त्यांच्या लग्नात वधूंना रडणे खूप महत्वाचे आहे. असे मानले जाते की ही अनोखी परंपरा 475 बीसी ते 221 बीसी दरम्यान सुरू झाली आणि 17 व्या शतकात ती शिखरावर होती. असे म्हटले जाते की जेव्हा जाओ राज्याच्या राजकन्येचे लग्न झाले तेव्हा तिची आई आपल्या मुलीपासून विभक्त झाल्याच्या दु:खाने रडली. त्या घटनेनंतर या जमातीत वधूच्या रडण्याची परंपरा सुरू झाली.

वधू 30 दिवस दररोज रडते :

ही अनोखी परंपरा लग्नाच्या एक महिना आधी सुरू होते, ज्याचे पालन वधूच्या कुटुंबाकडून मोठ्या भक्तीने केले जाते. दररोज नववधूला तासभर रडावे लागते आणि या वेळी कुटुंबातील महिला तिच्यासाठी पारंपरिक गाणी गातात. ही गाणी वधूच्या आयुष्यात येणारे बदल आणि तिच्या कुटुंबाशी असलेल्या नात्याविषयीच्या भावना व्यक्त करतात.

- Advertisement -

वधूसोबत घरातील सदस्यही रडतात :

पहिल्या दिवशी वधू एकटीच रडत नाही, तर तिची आई आणि आजीही तिच्यासोबत मनापासून रडतात. सुरुवातीचे हे दिवस असे असतात की जेव्हा नवरी आपल्या आईच्या मांडीवर डोके ठेवून रडते आणि आपल्या भावना आईसोबत शेअर करते.

जसजसे दिवस पुढे जातात तसतसे नववधूचे अश्रू अधिक गडद होत जातात. ही प्रक्रिया तिच्यासाठी नव्या आयुष्याचीच सुरूवात असते. जिथे ती तिच्या जुन्या स्व‍त्वाला सोडून नवे जीवन सुरू करत असते. एक महिना चालत असलेल्या या प्रक्रियेमध्ये नवरीला तिच्या घरच्यांकडून प्रेम आणि सहानुभूती मिळत असते. ही परंपरा नववधूमध्ये एक नवी उमेद निर्माण करते आणि नवरीला असा विश्वास देते की ती अजिबात एकटी नाही.

हेही वाचा : New Year Celebration : नववर्षाच्या सेलिब्रेशनसाठी परफेक्ट बीच डेस्टिनेशन्स


Edited By – Tanvi Gundaye

- Advertisment -

Manini