Sunday, December 3, 2023
घरमानिनीRelationshipलग्नापूर्वी मुलीला माहिती असाव्यात 'या' गोष्टी

लग्नापूर्वी मुलीला माहिती असाव्यात ‘या’ गोष्टी

Subscribe

प्रत्येक मुलीच्या आयुष्यातील मोठा टर्निंग पॉइंट म्हणजे लग्न करणे. लग्नापूर्वी मुलीला तिचे आई-वडील काही गोष्टी सांगण्यास सुरुवात करतात. जसे की, सासरच्या मंडळींसंदर्भातील काही गोष्टी. काही वेळेस हे नाते, तेथील जबाबदाऱ्या सांभाळत महिलेने स्वत:कडे सुद्धा कसे लक्ष द्यावे याबद्दल सांगितले जाते. काही महिला अशा असतात की, ज्यांची स्वप्न ही कधीच पूर्ण होत नाहीत. त्यामुळे प्रत्येक आई-वडीलांनी आपल्या मुलीला पुढील काही गोष्टी लग्नापूर्वी जरुर सांगितल्या पाहिजेत.

-नेहमीच सेल्फ इंडिपेंटेंड रहा
बहुतांश मुली लग्नानंतर घर-परिवार सांभाळण्यासाठी आपले करियर दाव्यावर लावतात. पण नेहमीच सेल्फ इंडिपेंटेंड असले पाहिजे. तुम्ही पैसे किंवा एखाद्या गोष्टीसाठी कोणावरीही डिपेंट राहू नये. तुमच्या पैशांवर तुमचा अधिकार असतो हे नेहमीच लक्षात ठेवा. त्यामुळे पैसे खर्च करताना कोणालाही आधी विचारण्याची गरज नाही. एक्सपर्ट्स असे म्हणतात की, पैशांवरुन कपलमध्ये वाद होतात. जर तुम्ही सेल्फ इंडिपेंटेंड असाल तर अशी स्थिती उद्भवणार नाही.

- Advertisement -

-सेल्फ रिस्पेक्ट महत्त्वाचा
आपण मोठ्यांचा आदर केला पाहिजे. त्याचसोबच नवऱ्याचा सुद्धा रिस्पेक्ट करावा. पण वेळोवेळी सेल्फ रिस्पेक्ट डावलून दुसऱ्यांना खुश करणे योग्य नाही. जर तुमच्या सेल्फ रिस्पेक्टबद्दलची गोष्ट असेल तर स्वत:ला प्राथमिकता द्या. जर तुम्ही तुमच्या आत्मसन्मानाकडे लक्ष दिले नाही तर तुमची कोणीही कदर करणार नाही.

-वारंवार एडजस्टमेंटपासून दूर रहा
हॅप्पी मॅरिड लाइफसाठी एडजस्टमेंट फार गरजेची आहे. पण वारंवार एडजस्टमेंट करायची असेल तर हे चुकीचे आहे. काही क्षणासाठी आपण आपला आनंद डावलू शकतो. पण वारंवार असे केल्याने तुम्ही मानसिकरित्या स्थिर राहत नाही.

- Advertisement -

-छळ सहन करू नका
तुम्ही भले पार्टनरवर खुप प्रेम करत असाल पण प्रेमाची किंमत म्हणून त्याचा छळ अजिबात सहन करू नका. कधीकधी मानसिक आणि फिजिकल अब्यूज केले तरीही ते सहन करू नका.

-स्वत:साठी वेळ काढा
बहुतांश महिला आपल्या परिवाराची काळजी घेण्यात ऐवढ्या व्यस्त होतात की त्यांना स्वत:साठी वेळ मिळत नाही. अशातच काही महिला मानसिक रुपात आजारी पडू शकतात. त्यामुळे स्वत: साठी वेळ काढणे अत्यंत गरजेचे आहे.

-नाही बोलणे गरजेचे
बहुतांश महिला आपल्या संसाराचा गाडा व्यवस्थितीत सुरु रहावा म्हणून काहीही बोलत नाही. प्रत्येक गोष्टीसाठी होकार देतात. पण असे करणे चुकीचे आहे. असे केले नाही तर लोक तुमचा गैरफायदा घेऊ शकतात. त्यामुळे प्रत्येकाला होकार देण्याऐवजी नकार ही द्या.


हेही वाचा- आयुष्यात अशा लोकांपासून नेहमीच रहा दूर

- Advertisment -

Manini