आपल्या सर्वांनाच माहिती आहे की, वैवाहिक आयुष्यात आनंदित राहण्यासाठी एकमेकांना समजून घेण्यासह नात्यात विश्वास असणे अत्यंत गरजेचे असते. परंतु कधीकधी पार्टनरमध्ये वाद होतात. अशातच त्याचा नात्यावर परिणाम होतो. नवरा-बायकोच्या नात्यात दूरावा आणण्यासाठी नक्की कोणत्या गोष्टी कारणीभूत ठरतात हे जाणून घेऊयात.
-तुझ्याशी लग्न करुन चुक झाली
लग्न केल्यानंतर असे वाटते की, या पाटनरशी लग्न का केले. कधीकधी हे पार्टनरला थेट बोलून दाखवले जाते. तुझ्याशी लग्न करुन चुक झाली असे कधीच पार्टनरला बोलू नये. यामुळे नात्यात फूट पडू शकते.
-तू तुझ्या आई-वडिलांसारखा आहे
पार्टनरची तुलना त्यांच्या आई-वडिलांशी करणे अत्यंत चुकीचे आहे. असे केल्याने तुमच्या नात्यात वाद होऊ शकतात. याचा नात्यावर नकारात्मक परिणाम पडतो.
-तू प्रेम करत नाही
असे बोलल्याने पार्टनरच्या भावनांना ठेच पोहचू शकते. जर तुम्ही पार्टनवर प्रेम करत असाल तर कधी असे बोलू नका.
-माझे लग्न दुसऱ्याशी झाले असते
तुझ्याशी नव्हे तर दुसऱ्याशी लग्न झाले असते असे रागात पार्टनर सहज बोलतात. मात्र वैवाहिक आयुष्यावर याचा परिणाम होऊ शकतो. अशातच गरजेचे आहे की, तुम्ही नात्याती वाद बोलून सोडवा.
हेही वाचा- लग्न मोडण्यास कारणीभूत ठरतात ‘या’ गोष्टी