Prepare time: 10 min
Cook: 10
Ready in: 30 min
Ingredients
- 2 कप गव्हाचे पीठ
- 2 बारीक चिरलेला कांदा
- बारीक चिरलेली कोथिंबीर
- 1 चमचा आलं-लसूण पेस्ट
- 1 हिरवी मिरची (बारीक चिरून)
- 1/2 चमचा जिरं
- 1/2 चमचा लाल तिखट
- 1/2 चमचा हळद
- 1 चमचा गरम मसाला
- 1/2 चमचा आमचूर पावडर
- मीठ चवीनुसार
- तेल
Directions
- एका भांड्यात गव्हाचं पीठ घ्या.
- त्यामध्ये चिरलेला कांदा, कोथिंबीर, आलं-लसूण पेस्ट, हिरवी मिरची, जिरं, लाल तिखट, हळद, गरम मसाला, आमचूर पावडर आणि मीठ घाला.
- आता थोडं तेल घालून १०-१५ मऊसर पीठ मळून घ्या.
- पीठाचे छोटे गोळे तयार करून प्रत्येक गोळ्याला लाटून घ्या.
- तवा गरम करून त्यावर तेल घालून लाटलेला पराठा शेकून घ्या.
- दोन्ही बाजूंनी सोनेरी रंग येईपर्यंत भाजा.
- याचा आस्वाद तुम्ही लोणी, दही किंवा चटणी सोबत घेऊ शकता.