आपल्या प्रत्येकाच्या स्वयंपाकघरात मसूरची डाळ असते. ही डाळ आरोग्यसाठीच नाही तर आपल्या त्वचेसाठी देखील खूप चांगली आहे. याच्या नियमित वापराने तुम्ही त्वचेच्या अनेक समस्यांवर मात करू शकता आणि तुमच्या त्वचेवर चमक आणू शकता. ग्लोइंग स्किन मिळवण्यासाठी आपण सर्वजण काही ना काही प्रोडक्ट असतो. पण तुम्हाला माहित आहे का की मसूर डाळ हा ग्लोइंग स्किनसाठी घरगुती उपाय असू शकतो. मसूर डाळीच्या वापराने पिंपल्स, डाग आणि कोरडी त्वचा अशा अनेक समस्यांपासून आराम मिळतो.
त्वचेच टॅनिंग दूर होते
मसूरच्या डाळीचा उपयोग त्वचेच टॅनिंग दूर करण्यासाठी केला जातो. यासाठी मसूरच्या डाळीला रात्रभर भिजत घाला. सकाळी उठल्यावर याची पेस्ट बनवून घ्या. नंतर या पेस्टला आपल्या त्वचेवर आणि मानेवर लावा. 20 मिनिटे ठेवा आणि थंड पाण्याने चेहरा धुवा. याने टॅनिंग कमी होईल.
मुरमं
मसूरच्या डाळीमध्ये अँटी बॅक्टरीयलचे गुणधर्म असतात. यासाठी मसूर डाळीच्या पावडरमध्ये गुलाब पाणी मिसळून पेस्ट बनवून घ्या. 15 ते 20 मिनिटे चेहऱ्यावर लावा. यामुळे त्वचा उजळेल आणि टवटवीत दिसेल.
सुरकुत्या कमी होतील
मसूरच्या डाळीमध्ये अँटी ऑक्सिडचे गुणधर्म असतात. जे चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी करते. यासाठी मसूरची डाळ दुधात भिजत घालून. याची पेस्ट बनवा चेहऱ्यावर 20 मिनिटे लावून धुवा.
डोळ्याखालील काळी वर्तुळे कमी होतील
मसूरची पेस्ट डोळ्याखालील लावल्याने काळी वर्तुळे कमी होतील. यासाठी मसुरची डाळ रात्री भिजत ठेवा. सकाळी 20 मिनिटे लावा. याने डोळ्याखालील काळी वर्तुळे कमी होतील.
त्वचा चमकदार बनवण्यासाठी
मसूरची डाळ डेड स्किन काढण्यासाठी मदत करते. यासाठी आधी मसूरची डाळ पिसून यात थोडसं मध मिसळून 10 मिनिटांनी धुवा.
मसूर डाळ आणि दुधाची पेस्ट
मसूर डाळ दुधात भिजवा, बारीक करून ही पेस्ट चेहऱ्यावर लावा. 20 मिनिटांनी धुवा. यामुळे त्वचा मुलायम आणि चमकदार होईल.
मसूर डाळ आणि मध पेस्ट
मसूराच्या पावडरमध्ये मध मिसळून पेस्ट बनवा आणि चेहऱ्यावर लावा. 15-20 मिनिटांनी धुवा. या पेस्टमुळे त्वचेला आर्द्रता मिळते आणि ती चमकते. मसूर डाळ आणि गुलाबपाणी फेस पॅकमसूराच्या पावडरमध्ये गुलाबपाणी मिसळून पेस्ट बनवा.
दही व मसूर डाळीचा पॅक
एका भांड्यात 3 चमचे मसूर डाळीची पावडर घ्या. या पावडरमध्ये थोडं दही घाला व घट्टसर पेस्ट बनवा. आता हे मिश्रण चेहऱ्याला व त्वचेला लावून हळूवार मसाज करा. ही पेस्ट 10 मिनिटे तशीच राहू द्या. त्यानंतर साध्या पाण्याने चेहरा स्वच्छ धुवा. या पेस्टमुळे त्वचा मुलायम होईल तसेच चेहऱ्यावरील डागही दूर होण्यास मदत होईल.
हेही पहा :
Edited By : Nikita Shinde