Sunday, April 21, 2024
घरमानिनीKitchenMatar Uttapam : टेस्टी मटार उत्तपा

Matar Uttapam : टेस्टी मटार उत्तपा

Subscribe

बऱ्याचदा सकाळी ऑफिसला जाताना नाश्ता काय करावा असा प्रश्न पडतो. त्यामुळे आज आम्ही तुमच्यासाठी मटार उत्तपाची घेऊन आलो आहोत.

साहित्य :

 • 1-2 कप मटार दाणे
 • 1 वाटी रवा
 • 3-4 हिरव्या मिरच्या
 • 2 मोठे चमचे दही
 • 1 छोटा चमचा बेकिंग सोडा
 • 1 वाटी बारीक चिरलेले टॉमेटो
 • कोथिंबीर
 • आलं
 • चवीपुरते मीठ

कृती :

Green Peas Uttapam | Instant Rave Uttapam Recipe |Uttapam Recipe For Lunch - YouTube

- Advertisement -
 • सर्वप्रथम मटारचे दाणे, आलं, हिरव्या मिरच्या एकत्र मिक्सरमध्ये वाटून घ्या. हे वाटण भांड्यात काढून त्यात रवा, दही, कोथिंबीर, मीठ घालून एकत्र करुन घ्या.
 • त्यानंतर हे मिश्रण 10-15 मिनिटे झाकून ठेवा आणि सारण घट्ट असल्यास त्यात थोडेसे पाणी घाला.
 • आता त्यात 1 छोटा चमचा बेकिंग सोडा घालून मिश्रण एकजीव करा. त्यानंतर तव्यावर तेल टाकून त्यावर टॉमेटो घालून त्यावर सारण घाला.
 • झाकण ठेवून गॅस मध्यम आचेवर ठेवा.
 • आता त्या सारणावर तेल टाकून पलटून घ्या आणि परत झाकण ठेवा. 2 मिनिटे झाल्यावर काढून घ्या.
 • तयार गरमागरम मटार उत्तपे नारळाच्या चटणी बरोबर सर्व्ह करा.

हेही वाचा :

Recipe : झटपट बनवा गुळाचा भात

- Advertisment -

Manini