मेहंदी लावणे प्रत्येकालाच आवडते. त्यामुळेच प्रत्येक सणाला किंवा लग्नसोहळण्यासाठी हातांवर मेहंदी आवर्जुन काढली जाते. मेहंदीच्या विविध डिझाइन्स सुद्धा हातावर सुंदर दिसतात. काही महिला मेहंदी ही नखांना सुद्धा लावतात. असे केल्याने नखांचा रंग बदलला जातो. मात्र काही दिवसांनी हातावरील मेहंदी निघून जाते पण नखांचा रंग हा पकटन निघत नाही. असातच तुम्ही नखांवरील मेहंदी कशी काढाल याच बद्दलच्या सोप्प्या ट्रिक्स आपण पाहणार आहोत.
नारळाच्या तेलाने हटवा नखांवरील मेहंदी
जर तुम्हाला नखांवरील मेहंदी हटवायची असेल तर त्यासाठी नारळाच्या तेलाचा वापर करू शकता. यामुळे नखांवरील मेहंदी निघून जाण्यास मदत होईल.
यासाठी तुम्हाला एका भांड्यात गरम पाणी करायचे आहे. त्यानंतर नखांना तेल लावा आणि आपले हात त्या गरम पाण्यात बुडवून ठेवा. असे केल्यानंतर आपल्या बोटांच्या मदतीने नख स्वच्छ करत रहा. यामुळे नखांवरील रंग निघण्यास मदत होईल.
साखरेचा वापर
आपण नेहमीच साखरेचा वापर ब्युटी ट्रिटमेंटसाठी करतो. मात्र नखांना मेहंदी लावली असेल तर साखरेचा वापर तुम्ही करू शकता. यामुळे मेहंदीचा नखांवरील रंग निघून जाईल.
यासाठी सर्वात प्रथम एका भांड्यात साखर घ्या. त्यात लिंबूचा रस मिक्स करा. आता आपल्या नखांना त्याने स्क्रब करा आणि हलक्या हाताने स्क्रब केल्याने हात स्वच्छ धुवा. यामुळे नखांना लावलेली मेहंदी निघेल.
(सर्वात महत्त्वाचे म्हणजे वर दिलेल्या उपायांचा वापर करण्यापूर्वी स्किन पॅट टेस्ट करुन जरुर पहा. कारण सर्वांची त्वचा ही वेगवेगळी असते.)