Tuesday, October 3, 2023
घर मानिनी Health स्मरणशक्ती बूस्ट करण्यासाठी 'या' टीप्स येतील कामी

स्मरणशक्ती बूस्ट करण्यासाठी ‘या’ टीप्स येतील कामी

Subscribe

हेल्दी आरोग्य आणि लाइफस्टाइलसाठी आपल्या सवयींमध्ये बदल केला पाहिजे. याचा सकारात्मक परिणाम आपल्या मेंदूवर आणि एकूणच संपूर्ण आरोग्याव गोतो. फिजिकल अॅक्टिव्ह राहिल्याने आपले स्नायू मजबूत होतात. जेव्हा आपले मानसिक स्नायू मजबूत असतील तर स्मरणशक्ती, एकाग्रता, कामाच्या गुणवत्तेत सुधारणा होते. यामुळे मानसिक आरोग्य सुदृढ राहण्यासाठी ब्रेन एक्सरसाइज करणे अत्यंत गरजेचे असते. (memory boost tips)

ब्रेन पॉवर बूस्ट करण्यासाठी काय कराल?
पजल खेळा
क्रॉसवर्ड पजल, सुडोकू गेम, जिग्सॉ पजल आणि अन्य गेम खेळल्याने आपली स्मरणशक्ती वाढू शकते. तसेच वर्ड-आय स्किल ही वाढली जाते. या प्रकारच्या खेळांसाठी कोग्निटिव्ह क्षमतेची गरज असते. हे गेम्स मनाला चॅलेंज देतात. स्मरणशक्ती सुधारली जाते. एडल्ट व्यक्तींनी काही वेळ यासाठी जरुर काढला पाहिजे. यामुळे ब्रेन एक्सरसाइज होते. मानसिक आरोग्य ही मजबूत होण्यास मदत होते.

- Advertisement -

विविध पुस्तके वाचा
पुस्तकांमधील पात्र, बहुतांश विचार, महिती यामधून आपण खुप काही शिकत असतो. ऐतिहासिक कथा-साहित्य ते क्लासिक पुस्कते वाचू शकतो. सस्पेंस आणि रोमँन्टिक पुस्तके हे मेंदूला आव्हान देतात. नव्या गोष्टी शिकणे आणि शब्दावली निर्माण केल्याने मानसिक आरोग्य मजबूत होते.

सर्व इंद्रियांचा वापर करा
अशा अॅक्टिव्हिटीमध्ये सहभागी व्हा जेथे सर्व इंद्रियांचा वापर करू शकता. विविध डिश शिजवणे, फूड फेस्टिव्हलमध्ये सहभागी होणे, नव्या रेस्टॉरंट्समध्ये जाण्याने सुद्धा ब्रेनला फायदा होतो. एकाच वेळी स्पर्श, पदार्थ चाखणे, पाहणे किंवा त्यावर लक्ष केंद्रित केल्याने सुद्धा आपला मेंदू मजबूत होतो.

- Advertisement -

मेडिटेशनसाठी वेळ काढा
मेडिटेशन केल्याने मन शांत होते. त्याचसोबत एंग्जायटीच्या समस्येपासून दूर राहण्यास मदत होते. लक्षात ठेवा की, स्मरणशक्ती मजबूत ठेवण्यासाठी मेडिटेशन करणे अत्यावश्यक असते. या व्यतिरिक्त सध्या ऑनलाईन ब्रेन गेम असतात. जे तुम्ही खेळल्याने सुद्धा तुमची स्मरणशक्ती वाढू शकते.

नव्या स्किल्स शिका
जेव्हा तुम्ही एखादी नवी स्किल्स शिकता तेव्हा मेंदूला चालना मिळते. एखाद्या प्रकारचे गाणे शिकवा, डांन्स किसा किंवा नवी भाषा शिका. यामुळे तुम्हाला नव्या अॅक्टिव्हिटीची सवय होईल. पण यामुळे स्मरणशक्ती ही वाढण्यास मदत होते.


हेही वाचा- लेट नाइट एंग्जायटीची समस्या असेल तर ‘या’ टीप्स करा फॉलो

- Advertisment -

Manini