एका विशिष्ट वयानंतर स्त्रियांना जसे मेनोपॉजमधून जावे लागते. त्याचप्रमाणे पुरूषांनाही एका विशिष्ट वयानंतर मेनोपॉजच्या समस्येला सामोरे जावे लागते. हो हे खरं आहे. वयाची चाळीशी कॉस केल्यानंतर महिलांप्रमाणेच पुरूषांच्या शरीरात बदल होऊ लागतात. पुरूषांच्या या स्थितीला एंड्रोपॉज असे म्हटले जाते. या काळात जसे स्त्रियांमध्ये इस्ट्रोजेन हार्मेान्स कमी होऊ लागतात. त्याचप्रमाणे वयाच्या चाळीशीनंतर पुरूषांच्या शरीरातील टेस्टोस्टेरॉन हार्मोन्स कमी होऊ लागतात. यासंदर्भातील लक्षणे, कारणे आणि उपाय जाणून घेऊयात,
लक्षणे –
- ऊर्जेचा अभाव
- लैगिंक इच्छेचा अभाव
- लठ्ठपणा
- झोपेचा अभाव
- स्ट्रेस आणि डिप्रेशन
महिलांप्रमाणे पुरूषांनाही मेनोपॉजच्या समस्येला सामोरे जावे लागते. वयाची चाळीशी कॉस केल्यानंतर महिलांप्रमाणेच पुरूषांच्या शरीरात बदल होऊ लागतात.
पुरूषांच्या शरीरात होणारे बदल –
- चाळीशीनंतर पुरूषांमध्ये स्पर्म निर्माण होण्याच्या संख्येत गतीने घट होण्यास सुरूवात होते. परिणामी, पुरूषांच्या लैगिंक इच्छेवर परिणाम होण्यास सुरूवात होते.
- स्ट्रेस, डिप्रेशन, आत्मविश्वासाचा अभाव अशा समस्या उद्भवू शकतात.
- मेनॉपॉजमुळे जुनाट आजार होण्याचा धोकाही निर्माण होतो.
- वजन वाढणे, स्नायु कमकुवत होणे आणि केस गळती देखील सुरू होते.
मेनपॉजमुळे जाणवणाऱ्या समस्या टाळण्यासाठी उपाय –
- सर्वात पहिले तर निरोगी आहार घ्यायला हवे. फळे, भाज्या, प्रोटिन्सयुक्त आहार सेवन करायला हवे.
- तुम्ही नियमित व्यायाम करायला हवा. दररोज काही वेळ व्यायाम करण्याची सवय शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी मदत करते.
- नियमित व्यायाम करण्याव्यतिरिक्त तुम्ही योगा, ध्यान किंवा प्राणायाम देखील करू शकता. याने स्ट्रेस, डिप्रेशन कमी होण्यास नक्कीच मदत होते.
50 वर्षापेक्षा जास्त वयाच्या पुरूषांमध्ये आढळतो मेनोपॉज –
तज्ञांच्या म्हणण्यानूसार, 50 पेक्षा जास्त वयाच्या पुरूषांमध्ये मेनोपॉजचे प्रमाण अधिक आढळते. कारण 50 वर्षानंतर पुरूषांच्या शरीरात टेस्टोस्टेरॉन हार्मोनची पातळी कमी होऊ लागते.
हेही पाहा –
Edited By – Chaitali Shinde