Saturday, May 27, 2023
घर मानिनी Health मैत्रिणींनो अशी घ्या मानसिक आरोग्याची काळजी

मैत्रिणींनो अशी घ्या मानसिक आरोग्याची काळजी

नेहमीच आनंदी राहणे म्हणजे मानसिक आरोग्य हेल्थी राहिल असे नाही. खरंतर मानसिक आरोग्य संतुलित असेल तर महिला उत्तम पद्धतीने आनंद, दु:ख, राग आणि एखाद्या स्थितीला त्या न घाबरता सामोरे जातात. परंतु जर महिलेने प्रत्येक स्थितीला समजून घेतले, स्विकारले आणि स्वत: च्या मानसिक आरोग्याची काळजी घेतली तर तिला स्वत: आनंदी असल्याचे अनुभवू शकते.

Women Mental Health
Women Mental Health

- Advertisement -

खरंतर पुरुषांच्या तुलनेत महिलांना काही मानसिक आरोग्यासंबंधितच्या आव्हानांचा सामना करतात. तसेच महिलांमध्ये चिंता, नैराश्याचा दर हा पुरुषांपेक्षा अधिक असतो. काही वेळेस शारिरीक आरोग्याच्या कारणास्तव ही त्यांच्या मानसिक आरोग्यावर प्रभाव पडतो. हार्मोनमध्ये बदल झाल्याने पोस्टपार्टम डिप्रेशन, मेनोपॉजदरम्यान डिप्रेशन किंवा प्रीमेंस्ट्रुअल डिस्फोरिक डिसऑर्डर ही सुद्धा त्याची काही कारणं असू शकतात.

मानसिक आरोग्याची अशी घ्या काळजी
-मानसिक आरोग्य उत्तम बनवण्यासाठी तुम्ही नियमित रुपात व्यायाम करा
-शांतपणाने विचार करुन काही गोष्टींबद्दल निर्णय घ्या
-मानसिक आरोग्य संतुलित राहण्यासाठी तुम्ही पुरेशी झोप घ्या
-ज्या लोकांनी तुमची मदत केलीय त्यांचे आभार माना
-नवे मित्रमैत्रीणी बनवण्याचा प्रयत्न करा
-अशा काही गोष्टींमध्ये तुम्ही व्यस्त रहा ज्या तुम्हाला करण्यास आवडतात


- Advertisement -

हेही वाचा- खळखळून हसणं असू शकत Smiling Depression

- Advertisment -

Manini