सध्याचे युग हे सोशल मीडियाचे युग आहे. जिकडे पाहावे तिकडे प्रत्येक व्यक्ती आपल्या फोनच्या स्क्रीनवर काही ना काही स्क्रोल करत असते. सोशल मीडियावर स्क्रोल करताना काही चांगल्या बातम्या दिसतात तर काही नकारात्मक बातम्याही दिसतात. जे लोक ऑनलाइन नकारात्मक बातम्या पाहण्यात जास्त वेळ घालवतात, त्यांना डूम स्क्रोलिंग करणारे म्हणून ओळखले जाते. डूम म्हणजे विनाश आणि स्क्रोलिंग म्हणजे मोबाईल स्क्रीनवर स्क्रोल करणे. या डूम स्क्रोलिंगमुळे मानसिक आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. नेमका या स्क्रोलिंगचा आपल्या आरोग्यावर काय परिणाम होतो हेच या लेखातून जाणून घेऊयात.
डूम स्क्रोलिंगचे नकारात्मक प्रभाव :
हा शब्द 2020 मध्ये म्हणजे कोविड महामारीच्या काळात वापरात आला. जेव्हा तुम्ही सोशल मीडियावर स्क्रोल करता तेव्हा तुम्हाला अनेक प्रकारच्या वाईट बातम्या दिसू लागतात, ज्याची तुम्हाला माहिती घ्यायची असते. हे सर्व पाहून आपल्याला वाईट वाटतं पण तरीही आपल्याकडून अशा बातम्या स्क्रोल केल्या जातात. याचा मानसिक आरोग्यावर वाईट परिणाम होतो. यामुळे तणाव, भीती आणि दुःखाची भावना वाढते. अनेक वेळा आपण ज्या गोष्टी पाहतो त्याबद्दल तासनतास विचार करत राहतो.
त्यामुळे निद्रानाशाची समस्याही उद्भवू शकते. जेव्हा तुम्ही काळजीत असता तेव्हा तुमचे मन सक्रिय होते आणि त्यामुळे तुम्हाला झोप येत नाही. यामुळे एकाकीपणा आणि पॅनिक अॅटॅकचा धोका देखील वाढू शकतो.
अनेकवेळा जेव्हा आपण तणावग्रस्त किंवा काळजीत असतो, तेव्हा आपण सोशल मीडियावर अशा गोष्टी पाहतो की ज्या आपल्या विचारांसारख्याच असतात. आपल्या विचारांशी साधर्म्य साधणाऱ्या असतात. जसे की जर कोणी दुःखी असेल, कोणाचा ब्रेकअप झाला असेल, तर तुम्ही अशाच पोस्ट पाहता ज्यामुळे तुम्हाला असं वाटतं की ठीक आहे, हे खरोखरच प्रत्येकाच्या आयुष्यात घडतं, यामुळे तुमच्या आतल्या नकारात्मक भावना आणखी वाढू लागतात. आणि एक प्रकारचे नैराश्य येऊ लागते. हे तणाव संप्रेरक कॉर्टिसॉलला सक्रिय करते जे अनेक प्रकारच्या मानसिक समस्यांना कारणीभूत ठरू शकते.
डूम स्क्रोलिंग कसे टाळावे?
स्क्रीन टाईम कमी करा
सकारात्मक सामग्रीला प्राधान्य द्या.
तुमच्या मोकळ्या वेळेत मोटिव्हेशनल चित्रपट पहा.
रात्री झोपण्यापूर्वी मोबाईल बंद करा.
व्यायाम करा.
आवडीची पुस्तके वाचा.
मित्रांसोबत वेळ घालवा.
हेही वाचा : Kumbhmela 2025 : कुंभमेळ्याला जाण्यापूर्वी घ्या ही खबरदारी
Edited By – Tanvi Gundaye