Sunday, February 25, 2024
घरमानिनीRelationshipरिलेशनशिपमध्ये मानसिक त्रास सहन करताय, तर असे सोडवा वाद

रिलेशनशिपमध्ये मानसिक त्रास सहन करताय, तर असे सोडवा वाद

Subscribe

पार्टनरमध्ये जेव्हा काही गोष्टी स्पष्ट नसतील तर नाते अधिक कॉम्प्लिकेटेड होऊ लागते. नात्यात राहून काहींना असे वाटते की, सर्वकाही उत्तम सुरु आहे. मात्र असे दुसऱ्यासोबत होत नाही. नात्यात जेव्हा कॉम्प्लिकेशन वाढले जातात तेव्हा प्रत्येकजण ते खुलेपणाने बोलेल असे होत नाही. ऐवढेच नव्हे तर पार्टनरला सुद्धा सांगता येत नाही की, त्यांची नक्की काय अपेक्षा आहे. अशा समस्येसोबच काही स्थिती सुद्धा निर्माण झाल्याने नात्यात अधिकच समस्या येऊ लागतात. मात्र तुमच्या नात्यातील वाद सोडवू शकता. त्यासाठी पुढील काही टीप्स नक्कीच तुमच्या कामी येतील. (Mental health problem in relationship)

-आपल्या समस्या ओळखा
रिलेशनशिप एक्सपर्ट्सच्या मते, तुम्हाला जर तुमच्या नात्यातील समस्या ओळखता आल्या नाही तर नात्यात वाद वाढू शकतात. अशातच उत्तम असेल की, तुम्ही समस्यांवर तोडगा काढा. नात्यात कोणत्याही गोष्टीबद्दल पारदर्शकता ठेवा.

- Advertisement -

-आत्मपरिक्षण करा
दुसऱ्यांच्या चुका काढण्याऐवजी तुम्ही कुठे चुकता याचे सुद्धा आत्मपरिक्षण करा. तुमच्या चुकांमुळे नात्यात कॉम्प्लिकेशन वाढू शकतात. पार्टनर नक्की काय बोलतोय किंवा त्याचे काय म्हणणे आहे हे सुद्धा समजून घ्या.

- Advertisement -

-पार्टनरसोबत चर्चा करा
जर तुम्हाला नात्यामुळे मानसिक त्रास सहन करावा लागत असेल तर पार्टनरशी जरुर बोला. या दरम्यान असे जाणून घेण्याचा प्रयत्न करा की, तुम्हालाच नव्हे तर दुसऱ्या पार्टनरला सुद्धा असा त्रास होतोय का? अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या नात्यातील वाद दूर करू शकता.

-तुमच्या भावना व्यक्त करा
जर तुम्ही नात्यात उदास राहत असाल किंवा एखाद्या समस्येचा सामना करत असाल तर त्यावर पार्टनरशी बोला. त्याला तुमच्या मनातील भावना सांगा. तुम्ही पार्टनरकडून काय अपेक्षा करता या बद्दल ही त्याला सांगा. जर भावना व्यक्त केल्या नाही तर नात्यातील वाद कधीच सुटणार नाही.


हेही वाचा- रिलेशनशिपमध्ये ‘या’ चुका करणे टाळा

 

- Advertisment -

Manini