Wednesday, October 4, 2023
घर मानिनी Health 'या' फूड्सने तुम्ही होता एंग्जायटीचे शिकार

‘या’ फूड्सने तुम्ही होता एंग्जायटीचे शिकार

Subscribe

आजच्या काळात एंग्जायटीची समस्या सामान्य झाली आहे. सकाळ पासून ते संध्याकाळ पर्यंत काम आणि जबाबदाऱ्यांच्या बोझ्याखाली व्यक्ती ऐवढा सैरभैर होतो की स्वत:साठी वेळ काढू शकत नाही. अशातच जेव्हा स्वत:साठी वेळ काढला जात नाही तेव्हा चिडचिडेपणा, तणाव अशा समस्या उद्भवू शकतात. ज्यावेळी मेंदू व्यवस्थितीत काम करत नाही तेव्हा काही गोष्टी अथवा फूड्स हे एंग्जायटीचे कारण होतात. अशातच जाणून घेऊयात कोणत्या फूड्सने तुम्ही एंग्जायटीचे शिकार होऊ शकता त्याबद्दल अधिक.

-कॅफेन
जर तुम्ही गरजेचेपेक्षा अधिक चहा किंवा कॉफीचे सेवन करत असाल तर त्याचा मानसिक आरोग्यावर परिणाम होतो. अधिक कॅफेनचे सेवन केल्याने स्ट्रेसचा धोका वाढता. अशातच चिडचिडेपणा, भीती निर्माण होते. कॅफेनमुळे झोप प्रभावित होते. त्यामुळे कॅफेनऐवजी हर्बल चहा, फळांचा ज्यूस अशा हेल्दी गोष्टींचे सेवन करा.

- Advertisement -

-अल्कोहोल
अल्कोहोलचे सेवन आरोग्यासाठी हानिकारक असतो. यामुळे स्ट्रेस वाढला जातो. अधिक अल्कोहोलचे सेवन केल्याने आरोग्यासंबंधित समस्या होऊ शकतात. यामुळे ब्लड शुगरचा स्तर वाढला जातो. या व्यतिरिक्त अल्कोहोलचे सेवन केल्याने व्हिटॅमिन-बी ची कमतरता, अनिद्रा अशा समस्या होऊ शकतो.

-हाय फॅट फूड्स
ज्या फूड्समध्ये फॅट अधिक असतात जसे की, बटर, मीट असे पदार्थ. यामध्ये असलेले फॅट्स मेंदूच्या रक्तप्रवाहाला कमी करू शकतात. रिसर्चनुसार, अधिक प्रमाणात गोड आणि फॅट पदार्थ खाल्ल्यास स्ट्रेसचा धोका वाढतो.

- Advertisement -

-मीठ
अधिकम मीठाचे सेवन केल्याने नुकसान पोहचू शकते. यामुळे मानसिक आरोग्य बिघडले जाते. त्याचसोबत अधिक मीठ खाल्ल्यास रोगप्रतिकारक शक्ती बिघडली जाते. यामुळे काही प्रकारचे आजार होऊ शकतात.

-फास्ट फूड
फास्ट फूड खाण्याची आवड असेल तर जंक फूड हे मर्यादेत खाल्ले पाहिजेत. अन्यथा त्याचा आरोग्यावर परिणाम होतो. मेंदूला हेल्दी ठेवायचे असेल तर फास्ट फूड पासून दूर रहा. या अनहेल्दी गोष्टींमुळे मधुमेह, बीपी, लठ्ठपणा अशा गंभीर समस्या होऊ शकते.

-तळलेले पदार्थ
बहुतांश लोकांना तळलेले पदार्थ खायला आवडतात. ते चविष्ट जरी असले तरीही यामुळे एंग्जायटीची समस्या निर्माण होऊ शकते. या फूड्सचा परिणाम मानसिक आरोग्यावर ही होतो.


हेही वाचा- वेळेवर लंच करणे शक्य नसल्यास ‘या’ टीप्सने सुधारा डाइजेशन

- Advertisment -

Manini