मेटल ज्वेलरी नेहमीच ट्रेंन्डमध्ये असते. महिला आपल्या हिशोबाने अशा प्रकारची ज्वेलरी कॅरी करतात. अन्यथा मेटल असणारे लांब झुमके, बांगड्या किंवा नेकलेस घालतात. या ज्वेलरीमुळे महिलांचा लूक अधिक खुलून दिसतो. मात्र काही महिलांना यामुळे समस्या होऊ शकते. त्यांच्या स्किनवर रॅशेज येऊ शकतात आणि खाज येते. जर तुम्हाला सुद्धा ही समस्या येत असेल तर पुढील काही घरगुती उपाय करू शकता. (Mental jewellery allergy)
टी-ट्री ऑइल
टी-ट्री ऑइलमध्ये अँन्टीबॅक्टेरियल गुण असतात, जे कोणत्याही प्रकारच्या त्वचेच्या एलर्जीला कंट्रोल करण्यास मदत करते. जर त्वचेवर एलर्जी झाली असेल तर तुम्ही एक चमचा नारळाच्या तेलात 3-4 थेंब टी-ट्री ऑइल टाका. आता ते कॉटन बॉलच्या मदतीने स्किनवर लावून थोडावेळ ठेवा. यामुळे आराम मिळेल.
एलोवेरा जेल
एलोवेरा जेलमध्ये अँन्टीबॅक्टेरियल गुण असतात. जे स्किनवर होणाऱ्या कोणत्याही प्रकारच्या संक्रमणाला ठिक करण्यासाठी कामी येऊ शकतात.
हळदीची पेस्ट
हळदीत अँन्टीबॅक्टेरियल, अँन्टीसेप्टिक, अँन्टीव्हायरल गुण असतात. जर स्किनवर मेटल ज्वेलरी घातल्यानंतर एलर्जी झाल्यास हळदीच्या मदतीने तुम्ही अगदी सहज त्यापासून बचाव करू शकता. यासाठी अर्धा चमचा हळद घ्या आणि त्यामध्ये पाणी मिक्स करून त्याची घट्ट पेस्ट तयार करा आणि एलर्जी झालेल्या ठिकाणी लावून ठेवा. 20 मिनिटांनी ती धुवा.
बर्फाने शेकवा
कोल्ड कंप्रेसच्या मदतीने तुम्ही मेटल एलर्जी पासून दूर राहू शकता. पावसाळ्यात जर स्किनवर एलर्जी झाल्यास तर बर्फाला एका प्लास्टिकमध्ये गुंडाळा आणि स्किनवर त्याने शेकवा.
कडुलिंबाची पाने
कडुलिंबाच्या पानात सुद्धा अँन्टिबॅक्टेरियल, अँन्टिसेप्टिक, अँन्टीवायरल, अँन्टिफंगल गुण असतात. याचा वापर करण्यासाठी तुम्ही काही लिंबाची पाने घ्या आणि त्याची एक पेस्ट तयार करा. अर्धा तास तरी ते स्किनवर लावा आणि धुवा.