घरलाईफस्टाईलमेथी काढा घ्या आणि शुगरवर नियंत्रण मिळवा

मेथी काढा घ्या आणि शुगरवर नियंत्रण मिळवा

Subscribe

डायबिटीज हा असा एक आजार आहे ज्याचा थेट संबंध तुमच्या लाईफस्टाईलशी संबंधित आहे. तुम्ही काय खाता किती खाता आणि कितीवेळा खाता आणि ते कसे पचवता यावरच तुमची शुगर लेवल अवलंबून असते. यामुळे डायबिटीज पेशंटला डॉक्टर नेहमी योग्य डाएट करण्याचा सल्ला देतात. पण त्याचबरोबर जर तुम्ही आहारात मेथीचाही समावेश केलात तर तुमची शुगर लेवल कायम नियंत्रणात राहण्यास मदत होईल.

मेथीमध्ये प्रोबायोटिक्सचे गुण असतात जे रक्तातील शुगर कमी करण्यास मदत करतात.

- Advertisement -

मेथीमध्ये आढळणारा अल्कलॉईड इन्सुलिनला नियंत्रणात ठेवतो. ज्यामुळे शुगर लेवल कमी होते. औषधांनीही शुगरवर नियंत्रण ठेवता येते. पण मेथीने देखील शुगर लेवल कमी होते.
त्यासाठी मेथीचा काढा नियमित घ्यावा.

मेथीचा काढा बनवण्यासाठी सुरुवातीला एक चमचा मेथी दाणे घ्यावे. ते मिक्सरमध्ये बारीक करून घ्यावे. नंतर एका पातेल्यात पाणी घेऊन त्यात ती मेथी पावडर टाकावी. हे मिश्रम १० ते १५ मिनिट उकळून घ्यावे. नंतर गाळून प्यावे.

- Advertisement -

दह्याबरोबरही मेथी खाल्ल्याने रक्तातील वाढलेली शुगर नियंत्रणात येण्यास मदत होते. यासाठी एक चमचा मेथीची पावडर दह्यात मिक्स करून त्याचे सेवन करावे.

गरम पाण्यात मेथीचे दाणे भिजवून ते खावे. यामुळे शुगर तर नियंत्रणात राहील त्याचबरोबर सतत खा खा होणार नाही. यामुळे वजनही नियंत्रणात राहील.

मेथीला मोड आणून ती खावी. तसेच रात्रभर एका ग्लास पाण्यात मेथीचे दाणे भिजवावेत. सकाळी तेच पामी गाळून प्यावे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -