Sunday, February 25, 2024
घरमानिनीKitchenदूधाचा ग्लास किंवा बॉटलमधून विचित्र वास येत असेल तर करा 'हा' उपाय

दूधाचा ग्लास किंवा बॉटलमधून विचित्र वास येत असेल तर करा ‘हा’ उपाय

Subscribe

आपण ज्या ग्लास किंवा बॉटल मधून दूध पितो त्यामधून दुर्गंधी येते. तुम्ही ते कितीही स्वच्छ धुतलात तरीही त्यामधील दुर्गंधी जात नाही. अशातच जेव्हा तुमच्या घरी एखादे पाहुणे येतात तेव्हा त्यांना त्याच ग्लासमध्ये पाणी देणे लाजिरवाणे ठरू शकते. जर तुम्ही या समस्येमुळे त्रस्त असाल तर पुढील काही टिप्स तुमच्या नक्कीच कामी येऊ शकतात.

दूधाचा ग्लास किंवा बॉटल अशी करा स्वच्छ
सर्वात प्रथम या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे की, दूधाचा ग्लास, घरी वापरले जाणारे ग्लास हे वेगळे ठेवले पाहिजेत. कारण ते दररोज स्वच्छ करणे थोडे मुश्किल होऊ शकते.

- Advertisement -

जर तुम्हाला असे करणे शक्य नसेल तर दूधाची भांडी व्यवस्थितीत धुतल्यानंतर उन्हात सुकवण्यासाठी ठेवा. त्यामुळे भांड्याना किंवा बॉटलमधून येणारा विचित्र वास निघून जाईल.

व्हिनेगरने अशा प्रकारे करा स्वच्छ
-सर्वात प्रथम एका भांड्यात पाणी गरम करा
-त्यात आता व्हिनेगर टाका
-दूधाचा ग्लास किंवा बॉटलमध्ये हे व्हिनेगर टाका
-आता ते 20 मिनिटांसाठी असेच ठेवा
-भांडी घासण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या स्क्रब किंवा ब्रशच्या मदतीने ते स्वच्छ करा
-आता पाण्याने धुवून उन्हात सुकवण्यासाठी ठेवा
-अशा प्रकारे भांड्याना येणारा वास निघून जाईल.

- Advertisement -

व्हिनेगर आणि सोड्याच्या मदतीने करा स्वच्छ
-यासाठी तुम्हाला एका भांड्यात व्हिनेगर, सोडा आणि विम लिक्विड एकत्रित करायचे आहे. त्यानंतर 20 मिनिटांपर्यंत ग्लास आणि बॉटलमध्ये थोडावेळ तसेच सोडून द्या
-आता ब्रश किंवा स्क्रबच्या मदतीने स्वच्छ करा
-अशाप्रकारे भांड्यांना येणारी दुर्गंधी दूर होईल

डिटर्जेंटच्या मदतीने असे करा स्वच्छ
-यासाठी तुम्ही गरम पाणी ग्लास मध्ये टाका
-आता अर्धा चमचा डिटर्जन पावडर मिक्स करून अर्धा तास तसेच ठेवा
-त्यानंतर त्यामधील साबणाचे पाणी काढून व्यवस्थितीत धुवा
-लक्षात ठेवा ग्लास आणि बॉटल उन्हात सुकण्यासाठी ठेवा, अन्यथा भांड्यांना डिटर्जेंटचा वास राहिल

 


हेही वाचा- Kitchen Tips : स्वयंपाक करताना फॉलो करा ‘या’ टिप्स

 

- Advertisment -

Manini