काहींना मिरचीचा ठेचा म्हटलं की तोंडाला पाणी सुटतं. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला घाटी स्टाईल लाल मिरचीचा झणझणीत ठेचा कसा बनवावा हे सांगणार आहोत.
साहित्य :
- पाव किलो लाल मिरच्या
- 10-12 लसूण पाकळ्या
- 1 चमचा जिरे
- 1 चमचा मोहरी
- 1 मोठा चमचा तेल
- चवीनुसार मीठ
कृती :
- सर्वात आधी लाल मिरच्या स्वच्छ धुवून त्याचे देठ काढून घ्यावे.
- नंतर एका भांड्यात तेल गरम करून त्यात जिरे-मोहरी घालून फोडणी द्यावी. लगेच त्यात लाल मिरच्या आणि लसूण, मीठ घालावे.
- हे मिश्रण 2-3 मिनिटे परतून घ्यावे.
- आता हे सर्व मिक्सरमध्ये बारीक करावे. जर शक्य असल्यास तुम्ही मिक्सरऐवजी दगडी
- खलबत्त्यामध्ये चेचून घेऊ शकता. यामुळे ठेचा अधिक चवदार होतो.
- तयार लाल मिरचीचा ठेचा तुम्ही भाकरी किंवा पोळीसोबत खाऊ शकता.