Tuesday, February 11, 2025
HomeमानिनीHome Decor : होम रिनोव्हेशन करताना टाळाव्यात या चुका

Home Decor : होम रिनोव्हेशन करताना टाळाव्यात या चुका

Subscribe

घराचे रिनोव्हेशन करणे म्हणजे घराला नवीन लूक देणे. रिनोव्हेशन केल्याने घर अजून सुंदर आणि आकर्षक दिसते. आपल्या प्रत्येकाला काळाप्रमाणे घर रिनोव्हेशन करावे लागते. बऱ्याचदा आपल्याला घराचा लूक बदलायचा असतो किंवा घरात काही नवीन काम करायचे असते. त्यामुळे आपण घरात रिनोव्हेशन करतो.

होम रिनोव्हेशन केल्यानंतर घर निश्चितच खूप सुंदर आणि आकर्षक दिसते परंतु घर रिनोव्हेशन करणे सोपे नसते. रिनोव्हेशन करताना काही चुका झाल्या तर पुढे अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. तसेच पैसा आणि मेहनत देखील वाया जाण्याची शक्यता असते. जर तुम्ही पहिल्यांदाच घराचे नूतनीकरण करत असाल तर या चुका टाळाव्यात. आज आपण जाणून घेऊयात होम रिनोव्हेशन करताना कोणत्या चुका टाळाव्यात.

स्पष्ट प्लॅनिंगचा अभाव

कोणते काम कसे करायचे याचा योग्य विचार न करता सुरुवात करणे. यामुळे तुम्हाला भविष्यात अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. आधी बजेट, डिझाईन, साहित्य आणि वेळेचा विचार करून प्लॅन तयार करून घ्या.

बजेट

बरेच लोक ठरावीक बजेट फिक्स करतात त्यानंतर बजेट वाढल्यामुळे त्यांना आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागते. सुरुवातीला एक निश्चित बजेट ठरवा आणि 10-15% अतिरिक्त खर्चासाठी राखीव ठेवा.

योग्य कॉन्ट्रॅक्टरची निवड

घर रिनोव्हेशन करताना सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे योग्य कॉन्ट्रॅक्टरची निवड करणे. बऱ्याचदा आपण कॉन्ट्रॅक्टरला पैसे देतो परंतु काम व्यवस्थित होत नसतं किंवा अनुभव नसलेल्या किंवा कमी दर्जाच्या कॉन्ट्रॅक्टरची निवड यामुळे आपले घराचे रिनोव्हेशन खूप हळू आणि नीट देखील होणार नाही. त्यामुळे योग्य कॉन्ट्रॅक्टरची निवड करा .

साहित्याचा दर्जा न तपासणे

कमी दर्जाचे साहित्य वापरल्यामुळे तुम्हाला भविष्यात अडचणी येऊ शकतात. काही वेळेस महागडे साहित्य दीर्घकाळ टिकते आणि पुन्हा तुम्हाला रिनोव्हेशन देखील करावे लागणार नाही.

ट्रेंडच्या मागे लागणे

आजकाल बरेच लोक ट्रेंडनुसार चालतात. त्यामुळे ते फक्त ट्रेंडमध्ये असलेले डिझाईन निवडतात जे काही काळानंतर जुने वाटू शकते. त्यामुळे नेहमी क्लासिक डिझाइची निवड करा.

वेळापत्रक न पाळणे

काम वेळेत पूर्ण न होणे त्यामुळे रिनोव्हेशनच काम पूर्ण व्हायला खूप वेळ लागतो.

या चुका होम रिनोव्हेशन करताना टाळाव्यात.

हेही वाचा : Health Tips : हिवाळ्यात आवळा खाण्याचे फायदे


Edited By : Prachi Manjrekar

Manini