Friday, January 3, 2025
HomeमानिनीMobile Screen Hygiene Tips : टॉयलेट सीटपेक्षा मोबाईल स्क्रीनवर अधिक बॅक्टेरिया

Mobile Screen Hygiene Tips : टॉयलेट सीटपेक्षा मोबाईल स्क्रीनवर अधिक बॅक्टेरिया

Subscribe

हल्ली मोबाइल आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक झाला आहे, असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यत मोबाइलशिवाय कोणतेच काम होत नाही. काहींना तर मोबाइल टॉयलेटमध्ये नेण्याची सवय असते. पण, तुम्हाला हे माहीत आहे का? मोबाइलचे व्यसन अनेक आजारांना आमंत्रण देणारे आहेच शिवाय मोबाइलच्या स्क्रीनवर असणारे बॅक्टेरीया शरीरासाठी अधिक घातक आहेत. कारण एखाद्या टॉयलेट सीटपेक्षा मोबाइल स्क्रीनवर अधिक बॅक्टेरीया असतात, अशी माहीती एका संशोधनातून समोर आली आहे.

पुढील बॅक्टेरीया स्क्रीनवर आढळतात –

एस्चेरीया कोलाई (Escherichia Coli) –

एस्चेरीया कोलाई बॅक्टेरीया स्टूलमध्ये आढळतो. यामुळे मुत्रमार्गाचे संक्रमण आणि आजार होण्याची शक्यता असते.

- Advertisement -

स्टॅफिलोकोकस (Staphylococcus) –

स्टॅफिलोकोकस बॅक्टेरीयामुळे त्वचेचे संक्रमण होते. याशिवाय न्यूमोनिया आणि अन्नातून विषबाधा होऊ शकते. अन्नातून विषबाधा तेव्हाच होते जेव्हा तुम्ही जेवताना फोन वापरता आणि हे बॅक्टेरीया तोंडावाटे आणि नाकावाटे शरीरात शिरतात.

स्ट्रेप्टोकोकस पायोजेन्स (Streptococcus Payogenes) –

स्ट्रेप्टोकोकस पायोजेन्स बॅक्टेरीया पृष्ठभागावर असतो. यामुळे घश्यातील इन्फेक्शन आणि त्वचेचे संक्रमण होते.

- Advertisement -

मोबाइलची स्क्रीन स्वच्छ कशी ठेवाल –

  • सर्वात पहिले तर तुम्ही नियमितपणे मोबाइल स्वच्छ करायला हवा. दिवसातून किमान एकदा तरी फोन स्वच्छ करणे आवश्यक आहे.
  • मोबाइल स्वच्छ करण्यासाठी मऊ कापडाचा वापर करावा.
  • याव्यतिरीक्त तुम्ही जंतूनाशक वाइप्सचा वापर करू शकता. यामुळे मोबाइलची स्क्रीन बॅक्टेरीयामुक्त होईल.
  • काहीचे असे म्हणणे असते की, अल्कोहोलमुळे मोबाइलची स्क्रीन स्वच्छ होते. पण, हे पूर्णत: चुकीचे आहे हे लक्षात घ्यायला हवे.

मोबाइल वापरताना या गोष्टी लक्षात घ्या –

  • मोबाइलवर बोलण्यासाठी वायर असणारे हेडफोन्स वापरावेत. कानाजवळ आणि तोंडाजवळ मोबाइल नेणे टाळायला हवेत.
  • जेवनाता मोबाइल वापरणे टाळा.
  • टॉयलेटमध्ये चुकूनही मोबाइल नेऊ नका.
  • सार्वजनिक ठिकाणी मोबाइल जपून वापरावा.

 

 

 

 

हेही पाहा –


Edited By – Chaitali Shinde

- Advertisment -

Manini