Thursday, September 28, 2023
Eco friendly bappa Competition
घर मानिनी Health चालता-फिरता मोबाईलचा वापर करणे ठरेल धोकादायक

चालता-फिरता मोबाईलचा वापर करणे ठरेल धोकादायक

Subscribe

आपल्यापैकी बहुतांशजणांना चालता-फिरता मोबाईलवर बोलण्याची सवय असते. तुम्ही सुद्धा असे करत असाल. मात्र तुम्हाला माहितेय का, जी लोक चालता-फिरता मोबाईलवर बोलतात त्यांच्यामध्ये कॅन्सर सारखा गंभीर आजार होऊ शकतो. जी लोक एकाच ठिकाणी थांबून फोनवर बोलतात त्यांच्यामध्ये या आजाराचा धोका कमी असतो. मात्र हालचाल करत मोबाईलवर बोलणे अधिक धोक्याचे ठरू शकते. आता तुम्ही विचार कराल असे नक्की का होत असेल तर याच बद्दल आपण अधिक जाणून घेऊयात.

खरंतर आपण जेव्हा चालता-फिरता मोबाईलवर एखाद्याशी बोलत असतो तेव्हा आपला फोन सतत सिग्नल शोधत असतो. कधीकधी तो सिग्नल बाहेर ही जातो किंवा कधी सिग्नलच्या संपर्कात असतो. याच कारणास्तव फोनमधून हाय लेव्हलचे रेडिएशन निघतात, जे कॅन्सरचा धोका उद्भवण्यास कारणीभूत ठरू शकतात. हेल्थ एक्सपर्ट्सनुसार, दीर्घकाळापर्यंत रेडिएशनच्या कॉन्टॅक्टमध्ये राहिल्याने काही आजारांचा धोका वाढू शकतो.

- Advertisement -

एक्सपर्ट्सच्या मते, मोबाईल फोन रेडियोफ्रीक्वेंसी तरंगांच्या रुपात इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनचे उत्सर्जन करतात. या तरंगाच्या कॉन्टॅक्टमध्ये अधिक वेळ राहिल्यास कॅन्सरसह काही आजारांचा धोका वाढू शकतो. ऐवढेच नव्हे तर काही वेळेस मोबाईल फोन हरवल्यास लोक रस्ते किंवा रेल्वे अपघाताचे शिकार सुद्धा होतात. या व्यतिरिक्त सेल फोनची स्क्रिन लांब असेल तर त्याचा डोळ्यावर ही वाईट परिणाम पडतो. एकूणच फोन हा आपल्याला काही गंभीर समस्यांमध्ये टाकू शकतो.

मोबाईल पाहण्याच्या नादात काही वेळेस झोप ही डिस्टर्ब ही होते. अशातच झोप पूर्ण न झाल्याने सकाळी चिडचिड होते. खरंतर मोबाईलच्या स्क्रिनमधून एक ब्लू लाइट निघते ती मेलाटोनिनच्या उत्सर्जनासाठी अडथळा आणते. मेलाटोनिन उत्म झोप येण्यासाठी एक महत्त्वाचे हार्मोन आहे.


- Advertisement -

हेही वाचा- ऑफिसमध्ये करा ही दोन कामं, शुगर आणि वजन राहील कंट्रोलमध्ये

- Advertisment -

Manini