मोमोज नॉर्थ इंडियातील लोकांचे आवडीचे स्ट्रीट फूड आहे. मात्र याचे नुकसान पाहिलेत तर तुम्ही ते खाणे सोडून द्याल. मोमोज बद्दल असे काही रिपोर्ट्स समोर आले आहेत की, त्याची चटणी आहे ती जीवघेणी ठरली आहे. मोमोज सिल्वरच्या स्टिमरमध्ये तयार केले जातात. हे शरिरासाठीसुद्धा अत्यंत नुकसानदायक असते. अशातच ट्विटरवर न्युरो अँन्ड स्पाइन सर्जन डॉक्टरांनी मोमोज का खाऊ नयेत याची काही वैज्ञानिक कारणे सांगितली आहेत.
मैदा हाडांसाठी हानिकारक
मोमोज हे मैद्यापासून तयार केले जातात. मैद्यातील प्रोटीन आणि फायबर काढले जातात आणि डेड स्टार्च शिल्लक राहतात. मैद्यात प्रोटीन नसल्याने ते अॅसिडिक होतात. ते शरिरात जाऊन हाडांमधील कॅल्शिअम शोषले जाते. मैदा व्यवस्थितीत डायजेस्ट होत नाही आणि काही वेळेस आपल्या फुफ्फुसात चिकटला जातो. यामुळे आपली फुफ्फुसे ब्लॉक होऊ शकतात. अशा प्रकारे विविध प्रकारचे आजार होऊ शकतात.
किडनी, पॅक्रियाज डॅमेज
घरी तयार केलेले मोमोज पिवळसर असतात. तर मार्केटमध्ये मिळणारे मोमोज हे अगदी पांढरे शुभ्र दिसतात. यामागील कारण असे की, त्यांना सॉफ्ट आणि सफेद बनवण्यासाठी ब्लीच, क्लोरीन गॅस, बेंजोयल पाराक्साइड, एजो कर्बेमिडचा मिक्सचा वापर केला जातो. हे केमिकल किडनी आणि पॅक्रियाजला डॅमेज करतात. त्याचसोबत मधुमेह होण्याचा धोका वाढतो.
लाल चटणी आतड्यांना नुकसान पोहचवते
मोमोज सोबत मिळणारी लाल तिखट मिर्चीची चटणी सर्वांना खायला आवडते. याची क्वालिटी अतिशय निष्कृष्ट असते. त्यामुळे पाइल्स, गॅस्ट्राइटिस, पोट किंवा फुफ्फुसात ब्लिडिंग होऊ शकते.
MSG अत्यंत धोकादायक
काही मोमोज विक्री करणारे, मोमोज मध्ये मोनोसोडियम ग्लूटामॅट नावाचे केमिकल मिक्स केले जातात. यामुळे याची टेस्ट वाढली जाते. या एमएसजीमुळे लठ्ठपणा वाढला जातो. ब्रेन तथा नर्व्सची समस्या, छातीत दुखणे, हार्ट रेट आणि बीपी वाढणे अशा समस्या उद्भवू शकतात.
डेड एनिमिल्सचे मीट
काही ठिकाणी नॉन वेज मोमोजमध्ये डेड एनिमल्सचे मीट मिक्स केले जातात. तर वेज मोमोजमध्ये खराब झालेल्या भाज्या सुद्धा टाकल्या जातात. या भाज्यांमधील किडे पोटात गेल्यानंतर शरिराला नुकसान पोहचू शकते.
हेही वाचा- गरजेपेक्षा अधिक Vitamin D चे सेवन करणे आरोग्यासाठी ठरु शकते घातक