आजकाल अनेकजण मोठ्या प्रमाणात फास्ट फूड खाणं पसंत करतात. तसेच लहानांपासून ते मोठ्यापर्यंत खाण्यापिण्याच्या आवडी निवडी वेगळ्या असतात. मात्र मोमोज हा पदार्थ असा आहे जो सगळ्यांनाच आवडतो. लहान मुलं देखील मोमोज खाणं खूप पसंत करतात. अशावेळी घरामध्ये बनवलेले मोमोज खाणं कधीही उत्तम ठरेल.
व्हेज मोमोज बनवण्यासाठी लागणारे साहित्य :
1.मोमोजच्या बाहेरील आवरणासाठी
- 2 वाटी मैदा
- 1/2 चमचा बेकिंग पावडर
- 1/2 चमचा मीठ
- 2 चमचा तेल
2.मोमोजचे सारण
- 1 चमचा तेल
- 1/2 वाटी पातळ चिरलेला कोबी, 1/2 वाटी किसलेले गाजर, 1 मोठा बारीक चिरलेला कांदा, 1 शिमला मिरची बारीक चिरलेली, 6-7 लसूण पाकळ्या, आलं, हिवऱ्या मिरच्या
- 1/4 चमचा मिरपूड
- 1 चमचा सोया सॉस
- चवीनुसार मीठ
कृती :
- मैद्यामध्ये मीठ, तेल आणि बेकिंग पावडर , थोडं पाणी घालून पीठ भिजत ठेवा.
- कढई मध्यम आचेवर ठेऊन त्यात तेल, कांदा, लसूण , आलं , मिरची परतून घ्या.
- त्यानंतर त्यात सर्व चिरलेल्या भाज्या घाला, त्या छान परतल्यावर त्यात सोया सॉस, मिरपूड , मीठ घालूण सारण तयार करूण घ्या.
- भिजत ठेवलेल्या मैद्याचे पुरीप्रमाणे लहान गोळे करून त्याची पातळ पुरू लाटून घ्या.
- आता त्या पुरीमध्ये भाज्यांचे सारण घालून मोदकाप्रमाणे त्याला आकार द्या.
- मोमोज उकडण्यासाठी कूकर किंवा इडलीच्या भांड्यात मोदकाप्रमाणे उकडून घ्या.
- तयार मोमोज टोमॅटो सॉससोबत सर्व्ह करा.