घर सुंदर, आकर्षक दिसण्यासाठी घरात विविध इनडोअर प्लांट्स लावले जातात. होम डेकोर करताना वास्तुशास्त्राचा विचार केल्यास मनी प्लांटला अधिक प्राधान्य दिले जाते. सध्या थंडीचे दिवस सुरू आहेत. या दिवसात सर्व झाडांची विशेष देखभाल करणे आवश्यक असते. वातावरणातील गारव्यामुळे रोपे कोमेजू लागतात, मनी प्लांटची पाने पिवळी पडू लागतात. अशावेळी तुम्ही काही ट्रिक्स वापरल्यात तर मनी प्लांटची पाने कमकुवत होणार नाहीत आणि पानेही पिवळी पडणार नाहीत. जाणून घेऊयात, मनी प्लांटची देखभाल कशी राखावी.
- थंड हवेमुळे मनी प्लांट खराब होण्याची शक्यता अधिक असते. अशावेळी मनी प्लांटची जागा बदलणे आवश्यक आहे.थंड हवा थेट झाडाला लागणार नाही याची काळजी घ्यावी.
- मनी प्लांट दिर्घकाळ टिकण्यासाठी उत्तम सूर्यप्रकाशाची गरज असते. त्यामुळे घरात मनी प्लांट ठेवताना सूर्यप्रकाश मिळेल अशी जागा निवडावी.
- मनी प्लांट अंधाऱ्या जागी ठेवू नये.
- थंडीच्या दिवसात मनी प्लांटची खराब झालेली पाने काढून टाकावीत. यामुळे पिवळ्या पानांची समस्या टाळता येईल.
- थंडीच्या दिवसात झाडांना जास्त पाण्याची गरज नसते. झाडातील मातीही लवकर कोरडी होत नाही. त्यामुळे या दिवसात मनी प्लांटला जास्त पाणी देऊ नये.
- या दिवसात झाडांना पाणी देण्यापूर्वी माती तपासावी. माती कोरडी असेल तरच झाडाला पाणी द्यावे.
- महिन्यातून एकदा मनी प्लांटची पाने स्वच्छ करावीत.
- हिवाळ्यात झाडाची वाढ मंदावते. त्यामुळे या काळात खतांचा वापर कमीत कमी करावा.
मनी प्लांटची पाने पिवळी का पडतात –
- मनी प्लांटची पाने पिवळी पडण्याचे सामान्य कारण म्हणजे झाडांना जास्त प्रमाणात पाणी देणे.
- मनी प्लांटला जास्त खत दिल्याने पाने पिवळी पडतात. त्यामुळे खताचा वापर योग्य प्रमाणातच करावा.
हेही पाहा –