घरलाईफस्टाईलMonsoon & Asthma: पावसाळ्यात दम्याच्या रुग्णांनी राहा सावध, अशी घ्या स्वत:ची काळजी

Monsoon & Asthma: पावसाळ्यात दम्याच्या रुग्णांनी राहा सावध, अशी घ्या स्वत:ची काळजी

Subscribe

दम्याचा त्रास हा माणसाच्या फुफुसांवर थेट परिणाम करतो.

पासळ्यामध्ये अनेक आजारांचा सामना लोकांना करावा लागतो यामध्ये डेंग्यू,मलेरीया,टायफाईड सारख्या आजारांबरोबरच दमा असणाऱ्या लोकांना पावसाळ्यात त्यांच्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागते. दम्याचा त्रास हा माणसाच्या फुफुसांवर थेट परिणाम करतो. यामुळे दम्याच्या रुग्णांना जलद गतीने चालण्यास,बोलण्यास ,श्वास घेण्यास त्रास होऊ लागतो. तसेच हा आजार गंभीर झाल्यास फुफुसांवर सूज देखील येऊ शकते. याची सुरूवात फंगस, धूळ, प्रदूषण, जनावरे, व्हायरल इंन्फेक्शन तसेच वातावरणात होणाऱ्या अचानक बदलावामुळे दमा होण्याची शक्यता आहे.

गुरूग्राम मधील कोलंबिया एशिया रुग्णालयातील क्रिटिकल केयर आणि पल्मोनरी-सीनियर कंसल्टंट डॉ. पीयूष गोयल यांच्या मते, ” मॉन्सून दम्याचे रुग्ण तसेच त्रास वाढण्याचे प्रमुख कारण आहे. पावसाळ्यात सुर्य किरणे पृथ्वीवर न पडल्यामुळे शरीराला विटामीन ड पुरेशा प्रमाणात मिळत नाही. तसेच वातावरणात थंडावा असल्याने थरथराट, खोकला,श्वास घेण्यास त्रास होणे यासारखे दम्याची लक्षणे आढळून येतात.

- Advertisement -

दमा पासून कसा कराल बचाव-

पासाळ्यात वातावरणात दमटपणा असल्याने घर स्वच्छ व शक्य तितके कोरडे ठेवावे.

घरातील कारर्पेट्स,बेडशीट्स,पिलो कवर,पडद्यावरील धूळ स्वच्छ करावी

- Advertisement -

ज्या दम्याच्या रुग्णांना इनहिलर घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. त्यांनी वेळोवेळी इनहिलरचा वापर करावा

दररोज श्वसनाचे व्यायाम,प्रणायम,मेडीटेशन करुन दम्याच्या रुग्णांनी नेहमी स्वत:ला सकारात्मक ठेवावे.

औषध, इनहिलरच्या वापरा बरोबरच दम्याचे रुग्ण नेबुलाइजरचा सुद्धा वापर करतात. नेबुलाइजर ही एक एयरोसोल-जनरेटिंग प्रकिया आहे. म्हणून याचा कोणत्याही व्यक्तीशी संपर्क होऊ न देता वापर करावा.

दम्याच्या रुग्णांनी कोणत्याही प्रकारची आपत्कालीन परिस्थिति ओढावल्यास तत्काळ डॉक्टरांशी संपर्क साधावा


हे हि वाचा – Monsoon Healthy Diet: पावसाळ्यात आजाराला दूर ठेवण्याचा डाएट प्लॅन, वाचा

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -