पावसाळ्याचे दिवस सुरु झाले आहेत. अशातच आरोग्याची काळजी घ्यावी असा सल्ला दिला जातो. त्यामुळे पावसाळ्यात डोळ्यांची काळजी घेतली नाही तर काही समस्या उद्भवू शकतात. जसे की, डोळ्यांना सूज येणे, डोळे लाल होणे. या व्यतिरिक्त डोळे कोरडे होण्यासह वायरल कंजंक्टिवाइटिस, कॉर्नियल अल्सर होण्याचा धोका सुद्धा वाढला जातो. (Monsoon eye care)
पावसाळ्यातील वायरल कंजंक्टिवाइटिसचे संक्रमण झाल्यास धोका वाढतो. याला सामान्य भाषेत Eye Flue असे म्हटले जाते. खाकरुन जेव्हा एखाद्या परिसरात फ्लू येत असेल तेव्हा लोकांनी सावधगिरी बाळगली पाहिजे. या व्यतिरिक्त पावसाळ्यात कॉर्निया संबंधित फंगल इंफेक्शनची प्रकरणी वाढली जातात. वातावरणात ह्युमिडिटी वाढल्याने इंफेक्शन आणि व्हायरलचा धोका वाढला जातो. त्यामुळे लोकांना हे कळले पाहिजे की, पावसात भिजल्यानंतर खासकरून डोळे स्वच्छ पाण्याने धुतले पाहिजेत.
अशी घ्या काळजी
पावसाळ्यात हायजीनकडे लक्ष दिले पाहिजे. अन्यथा तुम्ही आजारी पडू शकता.
-पावसाळ्यात हँन्डवॉश करत रहा आणि वारंवार डोळ्यांना स्पर्श करु नका
-दिवसातून दोनवेळा तरी डोळे स्वच्छ पाण्याने धुवा
-एखादी समस्या असेल तर Eye तज्ञांना भेटा
-डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय डोळ्यांमध्ये कोणतेही ड्रॉप्स टाकू नका
-डोळ्यांची समस्या वाढली असेल तर पावसात जाणे टाळावे