Monday, September 25, 2023
Eco friendly bappa Competition
घर मानिनी Health पावसाळ्यातील व्हजायनल इन्फेक्शन पासून असा करा बचाव

पावसाळ्यातील व्हजायनल इन्फेक्शन पासून असा करा बचाव

Subscribe

पावसाळ्याचे दिवस सुरू झाले आहेत. यामुळे वातावरणात ओलावा अधिक निर्माण होतो आणि बॅक्टेरिया अधिक वाढले जातात. याच कारणास्तण संक्रमण होण्याचा धोका ही वाढतो. या ऋतूत वजाइनल इंन्फेक्शन होण्याची सुद्धा शक्यता असते. वजाइनाच्या आसपास नेहमीच ओलावा राहतो. यामुळे युटीआय, यीस्ट इंन्फेक्शन आणि अन्य वजाइनल संक्रमण वाढले जाते. (Vagina Infection)

खरंतर पावसाळ्यात वजाइनल इंन्फेक्शनचा धोका वाढला जातो. खासकरून अशा महिलांमध्ये ज्यांना मधुमेह, लठ्ठपणा किंवा प्रेग्नेंट आहेत. पावसाळ्यात ह्युमिडिटी आणि ओलाव्यामुळे बॅक्टेरियल फंगस वेगाने वाढू लागतात. अशातच फंगल इंन्फेक्शन होणे सामान्य आहे. त्यामुळे पावसाळ्यात विशेष काळजी घेतली पाहिजे.

- Advertisement -

कपडे पूर्णपणे ड्राय करा
पावसाळ्यात नेहमीच कपडे पूर्णपणे सुकले जात नाहीत. त्यामध्ये थोडातरी ओलावा राहतो. अशातच असे कपडे घातल्याने त्यामधून एक विचित्र वास ही येऊ लागतो. खासकरून अंडरगार्मेंट कपडे. त्यामुळे कपडे पूर्णपणे सुकले असतील तरच घाला.

- Advertisement -

या व्यतिरिक्त पावसाळ्यात तुम्ही कधीच सिंथेटिक कपड्यांचे अंडरगार्मेट्स घालू नका. यामुळे हवा पास होत नाही आणि वजाइनच्या आसपास अधिक ओलावा निर्माण राहतो. यामुळे फंगल इंन्फेक्शनचा धोका वाढतो. यावेळी तुम्ही सैल कॉटनचे अंडरगार्मेट्स घातले पाहिजेत.

दिवसातून दोन वेळा अंडरगार्मेंट्स बदला
पावसाळ्यात ह्युमिडिटी वाढल्याने अंडरगार्मेंट्स लवकर ओलसर होतात. अशातच संक्रमणाचा फैलाव होणारे बॅक्टेरिया आणि फंगस तयार होऊ शकते. अशा स्थितीपासून दूर राहण्यासाठी तुम्ही दिवसातून कमीत कमी दोन वेळा अंडरगार्मेंट्स बदलाव्यात.

सॅनिटरी पॅडच्या ऐवजी मेंस्ट्रुअल कपचा वापर करा
पावसाळ्यात सॅनिटरी पॅडचा वापर केल्याने वजाइनल एरियामध्ये ह्युमिडिटी अधिक वाढली जाते. अशातच रॅशेज आणि अन्य संक्रमणाचा धोका वाढला जातो. जर तुम्ही टॅम्पॉनचा वापर करत असाल तर पीरियड ब्लडसह वजाइनल फ्लूइडस सुद्धा शोषून घेतले जातात. याच कारणास्तव वजाइनल इंन्फेक्शनचा धोका वाढतो. त्यामुळे मेंस्ट्रुअल कपचा वापर करणे बेस्ट पर्याय आहे.

हाइड्रेट रहा
पावसाळ्यात ह्युमिडिटी वाढल्याने शरिरात फ्लूइड आणि मीठ कमी होऊ लागते. अशातच पुरेशा प्रमाणात पाणी पिणे महत्त्वपूर्ण मानले जाते. कारण हाइड्रेट राहिल्याने तुम्ही तुमच्या शरिरातून टॉक्सिंस अगदी सहज बाहेर काढू शकता. या व्यतिरिक्त हाइड्रेशन तुमच्या वजाइनल पीएच वॅल्यूला मेंटेन ठेवतो. त्यामुळे युटीआय आणि अन्य संक्रमणाचा धोका कमी होतो.

स्वच्छता राखणे महत्त्वाचे
तज्ञ असे म्हणतात की, पावसाळ्यात हाइजिनची काळजी घेतली पाहिजे. कमीत कमी दोन वेळा तरी आपला वजाइनल एरिया स्वच्छ करावा. यासाठी सेंटेड आणि केमिकलयुक्त साबण किंवा इंटिमेट वॉशचा वापर करू नये.


हेही वाचा- Sanitary pads ची पण असते expiry date, ‘हे’ आहेत साईड इफेक्ट्स

- Advertisment -

Manini