Thursday, January 23, 2025
HomeमानिनीMood Boosting Food मूड बूस्ट करतात हे पदार्थ

Mood Boosting Food मूड बूस्ट करतात हे पदार्थ

Subscribe

आपल्याकडे आहारसंस्कृतीला फार महत्व आहे. कारण आहारावर शारिरीक आरोग्यच नाही तर मानसिक आरोग्यही अवलंबून असते. यामुळे काही पदार्थ खाल्यावर आपल्याला आनंद होतो. समाधान मिळतं. तर काही पदार्थ खाल्यावर आपला मूडच बदलतो. चिडचिड होते, अस्वस्थ वाटतं अचानक निराश वाटू लागतं. यामुळे मूड बदलवणारे कोणते आहेत हे पदार्थ ते समजून घेऊया.

चहा
चहा नैराश्यावर मात करण्यास मदत करतो. जर तुम्हाला वाटत असेल की ग्रीन टी पिल्याने फ्रेश वाटते, तर तेही बरोबर आहे. कारण. ग्रीन टीमध्ये मोठ्या प्रमाणात अँटिऑक्सिडंट असतात जे तुमचा मूड फ्रेश ठेवतात.

मासे
ट्यूना, सार्डिन, हेरिंग, लीक, ट्राउट, मॅकेरल, सॅल्मन यासारखे मासे खावे. कारण या माशांमध्ये ओमेगा ३ फॅटी अॅसिड असते. त्यामुळे मेंदूमध्ये सेरोटोनिन वाढते. ज्यामुळे तुम्हाला आनंदी वाटत. तसेच तुमची त्वचाही तजेलदार होते.

अंडी
अंडी जीवनसत्त्वे आणि प्रथिनांचा चांगला स्रोत आहे. त्यांच्याकडे कोलीन देखील आहे, एक न्यूरो-ट्रांसमीटर जे नैराश्याला हरवण्यास मदत करते आणि तुमचा मूड फ्रेश ठेवते.

शतावरी
शतावरीमध्ये ट्रिप्टोफॅन आणि फोलेट असतात जे न्यूरो-ट्रांसमीटर तयार करण्यासाठी आवश्यक असतात. त्यामुळे मन शांत राहते.

क्विनोआ
डाएट करणारे जो पदार्थ आवर्जुन खातात तो आहे क्विनोआ. क्विनोआ मेंदूतील सेरोटोनिनची पातळी वाढवून नैराश्य आणि चिंताशी लढण्यास मदत करतो. क्विनोआ हा व्हिटॅमिन बी चा एक चांगला स्रोत आहे. क्विनोआ रक्तातील साखर आणि उर्जेची पातळी स्थिर ठेवते, त्यामुळे चिडचिड होत नाही.

काजू
अक्रोड, आणि बदाम हे ओमेगा-३ फॅटी ऍसिडचे स्त्रोत आहेत. जे तुमचा मूड सुधारण्यास मदत करतात.

ब्लू बेरी
आपल्यापैकी अनेकांना स्ट्रॉबेरी, ब्लॅकबेरी, रास्पबेरी आणि ब्लूबेरी आवडतात. . बेरीमधील अँटिऑक्सिडंट्स तणावाशी लढण्यास मदत करतात.

पालेभाज्या
“पालेभाज्यांमध्ये मॅग्नेशियम, फोलेट आणि इतर न्यूरो-ट्रांसमीटर असतात जे सेरोटोनिन पातळीसह तुमचा मूड नियंत्रित करतात

ताजी फळे
साखर, कोणत्याही स्वरूपात, तुमचा खराब मूड आनंदी बनवते. हेल्दी फ्रूट सॅलड बनवण्यासाठी कमी चरबीयुक्त दही घ्यावे. त्यात काही फळे घालावी. तुम्ही त्यात केळी, सफरचंद, द्राक्षे आणि लिंबूवर्गीय फळे यांचा समावेश करू शकता. “नैराश्य दूर करण्याचा हा एक उत्तम मार्ग आहे.

केशर
केशर हा एक असा घटक आहे जो भारतीय मिष्टान्नांना स्वादिष्ट बनवतो. महिलांमधील नैराश्य आणि पीएमएस लक्षणे कमी करण्यासाठी केशर खूप प्रभावी असल्याचे सिद्ध झाले आहे.


Edited By

Aarya Joshi

 

Manini