Thursday, December 7, 2023
घरमानिनीKitchenRecipe: मूग डाळीपासून तयार करा पाणीपुरीच्या पुऱ्या

Recipe: मूग डाळीपासून तयार करा पाणीपुरीच्या पुऱ्या

Subscribe

पाणीपुरीचे नाव काढल्यानंतर तोंडाला पाणी सुटते. त्यामुळे पाणीपुरी तुम्हाला लोकल स्टॉल ते फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये सुद्धा मिळते. मात्र तुम्ही ती घरच्या घरी सुद्धा तयार करू शकता. अशातच आपण बाहेरून पाणीपुरीच्या पुऱ्या विकत आणतो किंवा रव्याच्या पुऱ्या बनवतो. पण कधी मूग डाळीपासून पाणीपुरीच्या पुऱ्या बनवल्या आहेत का? याचीच आज आपण रेसिपी पाहणार आहोत.

A complete guide to making pani puri at home | Condé Nast Traveller India

- Advertisement -

रेसिपी: 

  • सर्वात प्रथम एका बाउलमध्ये मूग डाळीचे पीठ घेऊन त्यात रवा व्यवस्थितीत मिक्स करा. नंतर बेकिंग सोडा, तूप आणि एक चमचा तेल टाकून मिक्स करा.
  • आता हलक्या हाताने ते पीठ मळून घ्या आणि थोडावेळासाठी ते तसेच ठेवा. पीठ मऊ होण्यासाठी ते अर्धा तास तरी ओलसर कपड्यात ठेवा.
  • अर्धा तासानंतर हाताला तेल लावून पाच मिनिटांपर्यंत हलक्या हाताने मळून घ्या. आता हलक्या हाताने पीठाचे लहान गोळे तयार करा आणि हाताने दाबून गोलाकार लाटा. असे केल्यानंतर लहान ग्लास घेऊन लहान-लहान पुऱ्या तयार करा. या दरम्यान कढईत तेल गरम झाल्यानंतर त्या पुऱ्या तळण्यासाठी टाका. अशा प्रकारे तयार होतील तुमच्या मूगाच्या डाळीच्या पाणीपुरीच्या पुऱ्या.

हेही वाचा- Paneer Cheese Sandwich : 10-15 मिनिटांमध्ये तयार करा पनीर-चीज सँडविच

- Advertisment -

Manini