श्रावण विशेष : मूगडाळीचे बालुशाही

moong dalichi baalu shaahi recipe
मूगडाळीचे बालुशाही

श्रावण महिन्यात गोडाधोडाचे पदार्थ केले जातात. त्यातीलच एक गोडाचा पदार्थ आज आपण पाहणार आहोत. ते म्हणजे मूगडाळीचे बालुशाही.

साहित्य

मूगाचे पीठ
साजूक तूप
साखर
वेलची
केशर
दूध
चवीनुसार मीठ

कृती

सर्वप्रथम दूध आणि तूप एकत्र करुन ते गरम करणे. थड झाल्यावर त्यात भिजेल एवढे मुगाचे पीठ घेणे आणि ते चांगले मळून एक तासभर ठेवणे. नंतर त्याचे गोळे करुन साजूक तूपातून बाजूला काढणे. नंतर साखरेचा एकतारी पाक करुन त्यात केशर आणि वेलची घालणे आणि हा पाक त्या तळलेल्या गोळ्यांवर ओतणे. अशाप्रकारे पिवळ्या मुगडाळीची बालुशाही तयार.