Morning Drinks: आलिया भट्ट पासून ते अनुष्का शर्मा ‘या’ हेल्दी ड्रिंक पासून करतात दिवसाची सुरुवात

मलायका अरोरा,अमुष्का शर्मा,आलिया भट्ट या सर्व अभिनेत्री आपल्या हेल्थसाठी तसेच तजेलदार स्किनसाठी आपल्या दिवसाची सुरूवात हेल्दी आणि फ्रेश ड्रिंक्स पासून करतात.

Morning Drinks: From Alia Bhatt to Anushka Sharma's secret of glowing skin drink
Morning Drinks: आलिया भट्ट पासून ते अनुष्का शर्मा 'या' हेल्दी ड्रिंक पासून करतात दिवसाची सुरुवात

सामान्यत: प्रत्येक ऋतूमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे ड्रिंक्सचे सेवन करण्याचा सल्ला आपल्याला डॉक्टर नेहमीच देत असतात. उन्हाळयात शरिराला थंड ठेवण्यासाठी नारळ पाणी,उसाचा रस पिणे. तसेच हिवाळ्यात किंवा पावसाळ्यात शरिराला उर्जा मिळण्यासाठी आपण गरम उर्जा देणाऱ्या ड्रिंक्स पिण्यास पसंती देतो. पण आज आपण बॉलिवूड कलाकारांच्या फेवरेट ड्रिंक्स बद्दल जाणून घेणार आहोत. मलायका अरोरा,अनुष्का शर्मा,आलिया भट्ट या सर्व अभिनेत्री आपल्या हेल्थसाठी तसेच तजेलदार स्किनसाठी आपल्या दिवसाची सुरूवात हेल्दी आणि फ्रेश ड्रिंक्स पासून करतात.तज्ञाच्या मते, आपल्या शरिराची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आपल्या आहारात रोगप्रतिकार शक्ती वाढवणाऱ्या ड्रिंक्स तेसच खाद्यपदार्थांचा समावेश असणे गरजेचं आहे. आज आपण अशाच काही हेल्दी ड्रिंक्स बद्दल जाणून घेणार आहोत ज्याचे सेवन अनेक कलाकार आपल्या दैनंदिन आयुष्यात करतात.

अनुष्का शर्मा- एल्डरफ्लॉवर टी

अभिनेत्री अनुष्का शर्मा तिच्या फिटनेसची विशेष काळजी घेतांना दिसते. ती नेहमीच एल्डरफ्लॉवर टी याचे सेवन करुन स्वत:ला फिट व मेंन्टेन ठेवते. तसेच एल्डरफ्लॉवर टी साइनिसाइटिस, सर्दी, फ्लू , डायबिटीज , कफ सारख्या आजरांसाठी फायदेशीर ठरते. एल्डरफ्लॉवर टी बणवण्यासाठी एक ग्लास पाण्यात आर्धा चमचा बेकिंग सोडा आणि आर्ध्या लिंबाचा रस एकत्र करुन पिणे.

​आलिया भट्ट- कोकम सरबत

आलिया भट्ट आपल्या दैनंदिन हेल्थ डाएटमध्ये कोकम सरबतचा समावेश हमखास करते. कोकम सरबत वजन कमी करण्यास खूप लाभदायक आहे. तसेच यामुळे शूगर लेवल मेंन्टेन राहण्यास मदत होते. तसेच आलिया भट्ट डिटॉक्स ड्रिंकमध्ये गरम पाणि आणि लिंबूचा रस,एक चमचा मध मिसळून रोज पिते

मलायका अरोरा-ग्रीन स्मूदी

मलायका अरोरा बॉलिवूडमधील सर्वात फिट वूमन आहे. आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर मलायका नेहमीच लोकांना फिट राहण्याचे आवाहन करत असते. स्वत:ला फिट ठेवण्यासाठी मलायका ग्रीन स्मूदीचे सेवन करते तसेच ती नियमीत नारळ पाणी आणि ॲप्पल बेस ग्रीन स्मूदीचं सेवन करते.

जॅकलीन फर्नांडिस- व्हीटग्रास शॉट्स

जॅकलीन स्कीन तजेलदार राहण्यासाठी व्हिटग्रास या पेयाचे दरोरज सेवन करते. यामध्ये विटामीन अ,क,इ ची मात्रा असते तसेच यामुळे शरिरातील हिमोग्लोबीनची पातळी वाढण्यास मदत होते. त्वचेवरील मुरूमाचे डाग,मुरूमे यावर व्हिटग्रास उपयूक्त ठरते.


हे हि वाचा – महिलांनो चाळीशीनंतर करा ‘या’ टेस्ट