हिवाळा सुरू झाल्यावर उशीरा पर्यत झोपून राहवेसे वाटते, ब्लॅकेटमधून बाहेर निघण्याची इच्छा होत नाही. काही जणांसाठी तर या दिवसात सकाळी लवकर उठणे हे फार अवघड काम असते. तुम्हालाही या गुलाबी थंडीत सकाळी उठण्याचा कंटाळा येत असेल तर ही बातमी तुमच्यासाठी. आज आम्ही तुम्हाला थंडीत सकाळी उठण्यासाठी तुम्ही कोणते रुटीन फॉलो करायला हवे, हे सांगणार आहोत. या छोट्या छोट्या ट्रिकने तुम्हाला सकाळी उठणे सोपे जाईल. जाणून घेऊयात, सकाळी लवकर उठण्यासाठी काही
रात्री लवकर झोपणे –
सकाळी लवकर उठण्यासाठी रात्री लवकर झोपावे. कारण सकाळी लवकर जाग न येण्यामागे तुमची अपूर्ण झोप हे कारण असू शकते. त्यामुळे सकाळी वेळेत झोपण्यासाठी रात्री वेळेत झोपावे.
अलार्म –
तुम्हाला सकाळी लवकर उठण्यासाठी अलार्म उपयोगी पडेल. हल्ली अलार्म असणारे घड्याळ कोणाकडे पाहायला मिळत नाही. त्यामुळे मोबाइलला अलार्म लावला जातो आणि मोबाइल डोक्याजवळ ठेवला जातो, जे शरीरासाठी हानिकारक असते. अलार्मसाठी मोबाइल जवळ ठेवण्याऐवजी बेडपासून दूर ठेवावा. ज्यामुळे निदान अलार्म बंद करण्यासाठी तुम्ही बेडवरून उठाल आणि तुमची झोप उडेल.
अलार्म रिंगटोन –
अलार्मची रिंगटोन एन्रजेटिक ठेवा. शांत आवाजाची रिंगटोन चुकूनही ठेवू नका.
तोंड धुणे –
अंथरूणावरून उठल्यावर लगेचच तोंड धुवा आणि तुमचे रुटीन सुरू ठेवा. जेणेकरून तुमची झोप उडेल.
मेडीटेशन –
रात्री शांत झोपेसाठी तुम्ही मेडीटेशन करू शकता. यामुळे तुम्हाला शांत झोप लागू शकते. रात्री शांत झोपेमुळे सकाळी फ्रेश वाटते आणि दिवसभर एनर्जेटीक वाटते. केवळ मेडीटेशन नाही तर एखादं हिलींग गाणंही ऐकू शकता..
वेळ निश्चित असणे आवश्यक –
तुमची रात्री झोपण्याची आणि सकाळी उठण्याची वेळ निश्चित असायला हवी. जेव्हा तुमचे शरीर दररोज एक रुटीन फॉलो करते तेव्हा शरीराला सवय होते आणि तुम्हाला सकाळी वेळेत जाग येते.
स्क्रीनिंग पासून दूर राहा –
कामाच्या ठिकाणी आपल्याला स्क्रीनिंगवर काम करावे लागते. ज्यामुळे संपूर्ण शरीरासह डोळेही थकतात. अशा परिस्थितीत तु्म्ही घरी जाऊन पुन्हा फोन घेतल्यास झोपेचे चक्र बिघडते आणि तुम्हाला सकाळी उठायचा असेल रात्री स्क्रीनिंगपासून दूर राहायला हवे.
हेही पाहा –
Edited By – Chaitali Shinde