साधारणत: डासांपासून वाचण्यासाठी काही लोक घरात डास घालवणाऱ्या वेपोरायझर मशीनचा वापर करतात. याच्या लिक्विडमध्ये काही असे केमिकल्स असतात. ज्यांच्या सुगंधाने काही मिनिटातच सर्व डास छूमंतर होतात. आणि आपम डेंग्यू, चिकनगुनिया यासारख्या आजारांपासून स्वत: चा बचाव करू शकतो. तुम्हाला माहित आहे का की याचा नकारात्मक परिणाम आपल्या शरीरावरही पडत असतो ? जाणून घेऊयात कशाप्रकारे हे वेपरायझर आपल्या शरीरावर परिणाम करतं. आणि आपल्या आरोग्यावर व मेंदूवर कसा याचा वाईट परिणाम होतो याबद्दल.
काय आहे धोका ?
सगळ्यात जास्त विकल्या जाणाऱ्या मस्किटो रिपलंट वेपरायझरमध्ये मोठ्या प्रमाणात केमिकल्सचा वापर केला जातो. जे आपल्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतात.हे वेपरायझर बनवण्यासाठी ट्रांसफ्लुएंट , ब्यूटाइलेटेड हायड्रॉक्सीटोल्यूइन अशी अनेक सुगंधी रसायने यासाठी वापरली जातात. सिट्रोनेलोल आणि डायमिथाइल ऑक्टाइन आणि गंधहीन केरोसिन सारख्या अनेक केमिकल्सचाही यासाठी वापर केला जातो. श्वसनासंबंधी त्रास, सर्दी, खोकला, त्वचेचे आजार अशा अनेक समस्या यामुळे वाढू शकतात. इतकंच नव्हे तर हे केमिकल्स कॅटेगरी 2 कार्सिनोजनच्या यादीमध्ये समाविष्ट करण्यात आले आहेत. याचा अर्थ असा की यामुळे कॅन्सर होण्याचाही धोका असतो.
गरोदर स्त्रियांकरिता हे फारच हानिकारक ठरू शकतं. कारण पोटातील बाळाच्या रोगप्रतिकारक शक्तीवर आणि त्याच्या डोक्यावर याचा परिणाम होतो. हे हायपोथायरिज्मचेही एक कारण असू शकते. याव्यतिरिक्त याचा प्रभाव पाळीव प्राण्यांवरही पडतो. यात उपयोग केलेल्या सुगंधित रसायनांमुळे फुप्फुसांचा आजार होण्याचा धोका निर्माण होतो. आणि हे त्वचेच्या अॅलर्जीचेही प्रमुख कारण ठरू शकते. तीव्र डोकेदुखी, एकाग्रतेमध्ये कमतरता अशा अनेक समस्याही यामुळे निर्माण होऊ शकतात.
इतकेच नाही, जर तु्म्ही तुमच्या घरातील खिडक्या – दरवाजे बंद करून याचा वापर करत असाल तर हे अधिकच धोकादायक ठरू शकतं. डॉक्टरांच्या म्हणण्यांनुसार, या केमिकल्सचा अद्याप कोणताही अँटिडोस नाही. यासाठी गर्भवती महिला, नवजात किंवा लहान मुले, वृद्ध व्यक्ती किंवा पाळीव प्राणी यांना या वेपरायझरपासून दूर ठेवणे अत्यंत गरजेचे आहे.
हेही वाचा : Winter Health Tips : हिवाळ्यात निरोगी राहण्यासाठी हे उपाय करा
Edited By – Tanvi Gundaye