Mothers Day 2022 : ‘मदर्स डे’ का साजरा केला जातो? काय आहे त्याचे महत्त्व?

आई आणि मुलांच्या नात्याची तुलना जगातील इतर कोणत्याच नात्याशी होऊ शकत नाही. आई आणि मुलाचे नाते जगातील पवित्र आणि निस्वार्थी असते. जगभरात 8 मे रोजी ‘मदर्स डे’ साजरा केला जातो. हा खास दिवस मातृत्वाचे महत्त्वाचा सन्मान करण्यासाठी साजरा केला जातो. परंतु तुम्हाला माहित आहे का, हा दिवस का साजरा केला?

मदर्स डे कधीपासून साजरा करण्यात आला?

मदर्स डे ची सुरूवात १९१४ साली झाली होती. खरंतर अॅना जार्विस या अमेरिकन महिलेने मदर्स डे साजरा करण्यास सुरूवात केली.अॅनाची आई तिच्यासाठी आदर्श होती. अॅनाचे तिच्या आईवर खूप प्रेम होते. मात्र जेव्हा तिच्या आईचे निधन झाले, तेव्हा अॅनाने कधीही लग्न न करण्याचा निर्णय घेत,आपल्या आईच्या आठवणीत तिचे संपूर्ण आयुष्य समर्पित केले. आईला सन्मान देण्यासाठी तिने मदर्स डे साजरा करण्यास सुरूवात केली.

मे महिन्यातील दुसऱ्या रविवारी साजरा का केला जातो?


१९१४ मध्ये अमेरिकेत एक कायदा मंजूर करण्यात आला होता. त्यानुसार, मे च्या दुसऱ्या रविवारी मदर्स डे साजरा केला जाईल असं नमूद करण्यात आलं होतं. त्यानंतर संपूर्ण जगात याच दिवशी मदर्स डे साजरा केला जातो.

मदर्स डे साजरा करण्याचे कारण?


आपल्या आईला खूश करण्यासाठी, तिचा सन्मान करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. या दिवशी अनेकजण आईला सरप्राइज किंवा गिफ्ट देऊन खूश करतात.