Thursday, May 25, 2023
घर मानिनी Relationship Motivational Tips- या 3 गोष्टीं तुम्हाला पुढे जाऊ देत नाहीत

Motivational Tips- या 3 गोष्टीं तुम्हाला पुढे जाऊ देत नाहीत

आयुष्य फार सुंदर आहे. त्यामुळे दुसऱ्याचे ऐकूण आपले आयुष्य वाया घालवू नका. बऱ्याचवेळा तुमच्या यशावर किर्तीवर प्रगतीवर जळणारे माणसं आपल्या जवळचीच असतात.ती तुम्हाला प्रोत्साहन देण्याऐवजी तुम्हांला निराश करण्याचंच काम करतात. ती तुम्हांला कधीच चॅलेंज स्विकारण्याचा सल्ला देत नाहीत तर उलट तुझं आता काही खरं नाही. तू हरलास.असंच काहीस सांगत तुमच्याभोवती नकारात्मक वातावरण तयार करतात.

यामुळे अशा व्यक्तींचे म्हणणे एका कानाने ऐकावे आणि दुसऱ्या कानाने सोडून द्यावे. पण करावे मात्र मनाचे. कारण कुठलच काम नाही जे दुसरे करू शकतात आणि तुम्ही नाही. मानवी स्वभावानुसार आपण जेव्हा नवीन काम सुरू करतो तेव्हा त्याच कामात यश मिळवलेल्या व्यक्तीबरोबर स्वतची तुलना करतो. खरं तर असं करणं चुकीचे आहे. रण जसं म्हणतात व्यक्ती तितक्या प्रकृती तसेच बिझनेस चालवण्याची पद्धतही प्रत्येकाची वेगवेगळी असते.

- Advertisement -

यामुळे त्याने जे केले ते तुम्ही करू नका. तर स्वतच्या आयडीया वापरा. आपल्या स्पर्धकांचा अभ्यास करा. एक ध्येय निश्चित करा. आपण बऱ्याचवेळा एखाद्या गोष्टीत कुटुंब मित्रांचा सल्ला घेतो. त्यातही एक गफलत करतो. जर तुमच्या व्यवसायाचा कामाबदद्ल त्यांना ज्ञानच नसेल तर ते तुम्हांला योग्य सल्ला कसा देऊ शकतात. याचा विचार करा. त्यांनी दिलेले सल्ले हे बहुतेक तुमच्या काळजीपोटी दिलेले असतात. पण बिझनेस साठी ते योग्यच असतील असे नाही. यामुळे तुमचे निर्णय तुम्हीच घ्या. त्यातून एकतर चांगल यश मिळेल नाहीतर अपयश. पण तुमची दिशा ठरेल.

- Advertisement -

तसेच आयुष्यात पुढे जायचे असेल तर ढिगभर मित्राचा ग्रुप बनवून टाईम पास करू नका. तुमचा वेळ अमुल्य आहे. तुमच्याभोवती असलेले सगळेच तुमच्या भल्याचा विचार करतील सच्चे मित्र असतील अडचणीत उभे राहतील अशी अपेक्षा करू नका.

 

चार पाचच मित्र बनवा. पण ते सच्चे मित्र बनवा. तुम्हांला अपयशाने खचून न जाता हिंमत ठेवण्यचा सल्ला देणारे. सर्व परिस्थितीत तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे सच्चे मित्रच तुम्हांला पुढे नेऊ शकतात.

चुका झाल्या त्यामुळे निराश होऊ नका .कुठे नेमके चुकले ते तपासा. त्याचा अभ्यास करा. नव्याने बिझनेस रचना करा. यश नक्की मिळेल.

 

 

- Advertisment -

Manini