उष्णतेमुळे तोंड येणे, अल्सर या समस्या त्रासदायक असतात. या समस्येमुळे काहीही खाणे आणि पाणी पिणेही कठीण होते. खरं तर, तोंडातील अल्सर शरीरातील पित्ताचे असंतुलन, कॅफिनचे अतिसेवन, फॉलिक ऍसिडची कमतरता, पोषक तत्वांची कमतरता अशी अनेक कारणांमुळे होतो. जर तुम्हीही तोंडाच्या अल्सरने त्रस्त असाल तर आज आम्ही तुम्हाला या समस्येपासून आराम मिळण्यासाठी काही सोपे उपाय सांगणार आहोत.
मध आणि हळद –
मध आणि हळदीमध्ये अॅंटी-बॅक्टेरियल आणि अॅंटी-इफ्लेमेंटरी गुणधर्म असतात. या उपायाने तोंडाच्या फोडांपासून आराम मिळेल. यासाठी तुम्हाला एक चमचा मधात चिमूटभर हळद मिक्स करा आणि खा.
तूप –
तूप पोषकतत्वांनी परिपूर्ण आहे. याच्या सेवनाने उष्णतेमुळे निर्माण झालेले तोंडातील व्रण कमी करण्यासाठी फायदा होतो. हळद हे आयुर्वेदातील एक शक्तिशाली औषध आहे, जे जळजळ कमी करते. हा उपाय करण्यासाठी 1 चमचा तूपात 1 चिमूट हळद मिक्स करा. रात्री झोपण्यापूर्वी तोंडातील फोंडावर लावा. या उपायाने काही दिवसात अल्सर कमी होतो.
ताक –
ताक हे थंड औषध मानले जाते. हे पचन सुधारण्यास, शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्यास आणि त्वचेच्या समस्या दूर करण्यास फायदेशीर मानले जाते. त्यामुळे तोंडातील उष्णता कमी करण्यासाठी तुम्ही ताकाचे सेवन करू शकता.
तुळशीची पाने –
तोडांच्या फोडांपासून आराम मिळवण्यासाठी तुळशीची पाने खावीत. या पानांमध्ये
अॅंटी-बॅक्टेरियल आणि अॅंटी-इफ्लेमेंटरी गुणधर्म असतात.
सुकं खोबरं –
सुक्या खोबऱ्याचे छोटे घेऊन त्याची पेस्ट तयार करून घ्या. तयार पेस्ट थोडावेळ तोंडात ठेवा आणि नंतर गिळून घ्या. हा उपाय दिवसातून 2 ते 3 वेळा करा, अल्सरपासून मुक्ती मिळेल.
हेही पाहा –
Edited By – Chaitali Shinde