Tuesday, January 21, 2025
HomeमानिनीMudras For Health : या हस्तमुद्रेने आजार राहतील दूर

Mudras For Health : या हस्तमुद्रेने आजार राहतील दूर

Subscribe

शरीर निरोगी राहण्यासाठी दररोज योग करण्यास सांगितला जातो. योगाच्या सरावाने शारीरिक आरोग्यासह मानसिक आरोग्य सुधारण्यास मदत होते. योगामध्ये अनेक हस्तमुद्रा सांगण्यात आल्या आहेत. या हस्तमुद्राच्या साहाय्याने शरीराचं आरोग्य उत्तम ठेवता येते. हस्त मुद्रा चिकित्सेनुसार, हात आणि हातांच्या बोटांनी तयार होणाऱ्या मुद्रामध्ये निरोगी आरोग्याचं गुपित दडलेलं आहे, असे म्हटले गेले आहे. आज आम्ही तुम्हाला अशी एक हस्तमुद्रा सांगणार आहोत, ज्याद्वारे शरीराला अनेक आजारांपासून दूर ठेवता येईल. ही हस्तमुद्रा आहे आदि मुद्रा.

आदि मुद्रा करण्याचे फायदे – 

  • आदि मुद्रा एक प्रभावी आहे. आदि मुद्रेच्या सरावाने श्वसनाशी संबंधित समस्या कमी होण्यास मदत मिळते. तुम्हाला श्वसनाशी संबंधित समस्या असतील आदि मुद्रेचा सराव करावा.
  • आदि मुद्रा केल्याने फुफ्फूसातील जळजळ आणि इन्फेक्शन दूर होते.
  • श्वसनप्रणाली मजबूत होण्यापासून आदि मुद्रेचा सराव करणे फायदेशीर असते. यामुळे ब्रॉन्कायटिस आणि दमा यासारखे आजार कमी होतात.
  • थंडीच्या दिवसात सर्दी-खोकल्याचा त्रास तुम्हाला जाणवत असेल तर आदि मुद्रा करणे उपयुक्त ठरेल. ही मुद्रा संसर्ग कमी करण्यासाठी ओळखली जाते.
  • आदि मुद्रा केल्याने शरीराती उर्जेची पातळी वाढते. ज्यामुळे शरीरात रक्ताचा, ऑक्सिजनचा स्तर वाढतो.
  • धावपळीच्या आयुष्यात मानसिक शांती मिळत नाही.अशावेळी तुम्हाला आदि मुद्रेच्या सरावाने मानसिक समाधान मिळण्यास मदत मिळते.
  • आदि मुद्रेच्या सरावाने ध्यान आणि एकाग्रता वाढते. यामुळे मनाला शांती मिळते. परिणामी, चिंता आणि तणावापासून सुटका होते.
  • आदि मुद्रा केल्याने मन एकाग्र होते.

कशी कराल आदि मुद्रा –

  • आदि मुद्रा करण्यासाठी शांत जागेची निवड करावी.
  • आदि मुद्रा शांत करण्यासाठी शांत स्थितीत बसावे.
  • यानंतर डोळे बंद आणि स्वत:ला शांत करावे.
  • दोन्ही हात जोडा .
  • श्वासावर लक्ष केद्रिंत करावे.
  • यानंतर हात मुठीप्रमाणे बंद करावे. फक्त अंगठा आतील बाजूस असेल याची खात्री करावी.
  • या मुद्रेचा सराव तुम्ही 10 ते 15 मिनिटे करू शकता.

 

 

 

हेही पाहा –


 

Manini