Wednesday, April 24, 2024
घरमानिनीAkshay tritiya 2023 : अक्षय्य तृतीयाला सोने का खरेदी करतात ?काय आहे...

Akshay tritiya 2023 : अक्षय्य तृतीयाला सोने का खरेदी करतात ?काय आहे विशेष महत्व ?

Subscribe

हिंदू धर्मियांसाठी हा सर्वात आनंदाचा आणि शुभ दिवसांपैकी एक मानला जातो, असे मानले जाते की हा दिवस नवीन प्रारंभासाठी शुभ असतो. त्या दिवशी जे सुरू होते ते वाढतच जाईल व त्याचे यश अक्षय्य म्हणजे कधीही न संपणारे ठरेल तसेच प्रगतीत कमी अडथळे येतील.

हिंदू पंचांगानुसार दरवर्षी वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीया तिथीला अक्षय्य तृतीयेचा सण साजरा केला जातो. अक्षय्य तृतीयेचा दिवस शुभ कार्यासाठी अत्यंत शुभ मानला जातो. या दिवशी लक्ष्मीची विधिवत पूजा करण्याची प्रथा आहे. यासोबतच या दिवशी सोने, चांदी इत्यादी खरेदी करणे शुभ मानले जाते. पंचांगानुसार या वर्षी अक्षय्य तृतीयेला अतिशय शुभ योग तयार होत आहे. अक्षय्य तृतीयेला सोने का खरेदी करतात हे आपण जाणून घेऊया….

भारतीय वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या तिसऱ्या दिवशी अक्षय्य तृतीया साजरी केली जाते. या दिवशी अन्न, वस्त्र, सोने आणि पाण्याचे दन केल्याने अक्षय फळाची प्राप्ती होते. या दिवशी जे काही दान केले करतो ते अक्षय होते आणि दान देणाऱ्याला सूर्यलोकाची प्राप्ती होते. अशी धार्मिक मान्यता आहे. तसेच घरात अक्षय्य तृतीयाला सोन्याची वस्तू खरेदी केल्याने घरात सोन्याची कमतरता भासत नाही.

- Advertisement -

Akshaya Tritiya 2018: Find out the top offers, discounts on gold, diamond, platinum jewellery today | Lifestyle News,The Indian Express

सोने का खरेदी करावे काय फायदे आहेत जाणून घेऊया-

- Advertisement -
  • आर्थिक दृष्टीकोनातून, सोने हे सुरक्षितआणि स्मार्ट गुंतवणूक यांचे प्रतीक मानले जाते.
  • हा सण वर्षातून एकदाच येत असल्याने अक्षय्य तृतीयाला सोन्यात गुंतवणूक करण्यासाठी चांगली वेळ आहे.
  • सोन्याला या दिवशी  भारतात खूप महत्त्व आहे कारण सर्व सोने आयात केले जाते आणि अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपयाचे सतत होणारे अवमूल्यन हे आजच्या सोन्याच्या किमतीमागील मुख्य कारण ठरते.
  • भारतातील प्रत्येक गुंतवणूक ही पोर्टफोलिओमध्ये सोने असणे आवश्यक आहे.
  • तुम्ही वर्षाच्या कोणत्याही वेळी सोन्याची गुंतवणूक करू शकता.
  • महत्वाचे म्हणजे महागाई आणि म्युच्युअल फंड आणि स्टॉक यासारख्या उच्च-जोखीम गुंतवणुकीच्या साधनांचे पर्याय म्हणून सोन्यात गुंतवणूक करणे फायदेशीर आहे.
  • बाकी गोष्टींपेक्षा सोने हे अत्यंत महत्वाचे मानले जाते. इतर मालमत्ता कमी होत असताना, सोने ही एकमेव मालमत्ता आहे जी वाढते.

हेही वाचा :

Akshaya Tritiya 2023 : वैवाहिक जीवन सुखमय करण्यासाठी अक्षय्य तृतीयेला करा ‘हे’ उपाय

- Advertisment -

Manini